IND vs SA : ऋतुराजला स्थान नाही, भारताची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IND vs SA : दक्षिण आफ्रिका आणि भारत (Team India Vs South Africa 2nd T20 :) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्याला सुरुवात झाली आहे.
IND vs SA : दक्षिण आफ्रिका आणि भारत (Team India Vs South Africa 2nd T20 :) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्याला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
खेळपट्टी कशी आहे ?
सेंट जार्ज पार्क मैदानात आतापर्यंत फक्त तीन टी 20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवलाय. तर एका सामन्यात धावांचा पाठलाग करत विजय मिळवण्यात आलाय. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 179 इतकी आहे. या मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी आहे. वेगवान गोलंदाज प्रभावी ठरु शकतात.
Team India Playing 11 भारताचे 11 शिलेदार कोणते ?
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, मुकेश कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
India: Yashasvi Jaiswal, 2 Shubman Gill, 3 Tilak Varma, 4 Suryakumar Yadav (capt), 5 Rinku Singh, 6 Jitesh Sharma (wk), 7 Ravindra Jadeja, 8 Arshdeep Singh, 9 Kuldeep Yadav, 10 Mohammed Siraj, 11 Mukesh Kumar
South Africa Playing 11 दक्षिण अफ्रीका संघात कोण कोण? :
रीजा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रिटज्के, एडन मारक्रम, हेनिरक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, Tristan Stubbs, मार्को यान्सन, आंदिले फेहलुख्वायो, Lizaad Williams, जेराल्ड कोएत्जी, तबरेज शम्सी.
South Africa: 1 Reeza Hendricks, 2 Matthew Breetzke, 3 Aiden Markram, 4 Heinrich Klaasen (wk), 5 David Miller, 6 Tristan Stubbs, 7 Marco Jansen, 8 Andile Phehlukwayo, 9 Gerald Coetzee, 10 Lizaad Williams, 11 Tabraiz Shamsi
🚨 Here's #TeamIndia's Playing XI 🔽
— BCCI (@BCCI) December 12, 2023
Follow the Match 👉 https://t.co/4DtSrebAgI
𝗡𝗢𝗧𝗘: Ruturaj Gaikwad was unavailable for selection for the 2nd #SAvIND T20I due to illness. pic.twitter.com/K52YOOgbwn
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 हेड टू हेड
सामने : 24
भारत : 13
दक्षिण आफ्रिका : 10
निर्णय नाही : 01
दक्षिण आफ्रिकेत
सामने: 07
भारत : 05
दक्षिण आफ्रिका : 02
सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात -
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला तीन सामन्यांची T20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळाणार आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे टी 20 संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर वनडेमध्ये केएल राहुल कर्णधार असेल आणि कसोटी मालिकेत रोहित शर्मा धुरा संभाळणार आहे. दुसरा T20 सामना 12 डिसेंबरला आणि तिसरा T20 सामना 14 डिसेंबरला होणार आहे.