(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sourav Ganguly: सौरव गांगुलींची लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतून माघार; कारण आलं समोर
Legends League Cricket: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलींनी (Sourav Ganguly) लीजेंड्स लीग क्रिकेटमधून माघार घेतली आहे.
Legends League Cricket: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलींनी (Sourav Ganguly) लीजेंड्स लीग क्रिकेटमधून माघार घेतली आहे. तब्बल 10 वर्षानंतर सौरव गांगुली मैदानात पुनरागमन करणार होते. परंतु, आता त्यांनी आपल्या निर्णयात बदल केलाय. लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये सौरव गांगुली यांच्यावर इंडिया महाराज संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. परंतु, वयैक्तिक कारणांमुळं सौरव गांगुलींनी लीजेंड्स क्रिकेटमध्ये न खेळण्यात निर्णय घेतलाय.
इंडिया महाराजा आणि वर्ल्ड इलेव्हन 16 सप्टेंबर रोजी आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी सौरव गांगुलींनी माघार घेतल्याची माहिती समोर आलीय. वेळेच्या कमतरतेमुळं खेळत नसल्याचं सौरव गांगुलींनी कारण दिलंय. वेळापत्रकानुसार, कोलकात्यात 16 ते 18 सप्टेंबर या कालावधीत एकूण तीन सामने खेळायचे आहेत. यानंतर उर्वरित सामने नवी दिल्ली, कटक आणि जोधपूर येथे खेळवले जातील. तर, बाद फेरी आणि अंतिम फेरीचं ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही.
सेहवाग कर्णधार बनण्याची शक्यता
सौरव गांगुलीनं माघार घेतल्यानं भारताचा तडाखेबाज माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागकडं इंडिया महाराजा संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. सहवाग व्यतिरिक्त हरभजन सिंहनी कर्णधाराच्या शर्यतीत आहे. यंदा लीजेंड्स लीगमध्ये एकूण 16 सामने खेळले जाणार आहेत. लीगच्या सुरुवातीला 16 सप्टेंबरला भारत महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात सामने खेळले जाणार आहेत.
संघ-
इंडिया महाराजा
वीरेंद्र सहवाग (संभावित कर्णधार), मोहम्मद कैफ, युसुफ पठान, एस. बद्रीनाथ, इरफान पठान, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस. श्रीसंत, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रज्ञान ओझा, अजय जाडेजा, आरपी सिंह, जोगिंदर शर्मा, रीतेंदर सिंह सोढी.
वर्ल्ड जाएंट्स
इयॉन मोर्गन (कर्णधार), लेंडल सिमंस, हर्शल गिब्स, जॅक कालिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नाथन मॅक्कुलम, जॉन्टी रोड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकाद्जा, मशरफे मुर्तजा, असगर अफगान, मिचेल जॉनसन, ब्रेट ली, केविन ओब्रायन, दिनेश रामदीन.
हे देखील वाचा-