Sourav Ganguly Corona Positive : बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोलकाता (Kolkata) येथील वुडलँड रुग्णालयात (Woodlands Hospital) त्यांना दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, सौरव गांगुली यांना पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण (Coronavirus) झाली होती.
टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना या वर्षाच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छातीत दुखत असल्यामुळं सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापूर्वी त्यांची एकदा अँजियोप्लास्टि करण्यात आली होती.
सौरव गांगुली यांची अँजियोप्लास्टी
यावर्षी 2 जानेवारी रोजी सौरव गांगुली यांनी छातीत दुखत असल्यामुळं कोलकाता येथील बुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. सौरव गांगुली आपल्या घरातील जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआउट करत होते. त्यावेळी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सौरव गांगुलीनंतर त्यांच्या मोठ्या भावावरही अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. दोघांवर कोलकाता येथील वुडलँड्स रुग्णालयातच अँजियोप्लास्टी करण्यात आली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 'विराटचा Attitude चांगला, पण आजकाल भांडणं खूप करतो,' सौरव गांगुलीच्या कोहलीला कानपिचक्या
- 'यावर बीसीसीआयचं बोलेल'; विराट कोहलीच्या स्पष्टीकरणावर सौरव गांगुलीचं मौन
- मेलबर्न कसोटीत इंग्लंडचा दुसऱ्या डावात 68 धावांत खुर्दा, अॅशेस मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात
- Pro Kabaddi League 2021 : यू मुंबा विरुद्ध तामिळ थलायवाजमधील सामना अनिर्णीत, तर पिंक पँथर्सचा युपी योद्धांवर विजय
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा