U19 Asia Cup 2021: अंडर- 19 अशिया चषकमध्ये भारतानं अफगाणिस्तानच्या संघावर 4 विकेट्सनं राखून विजय मिळवलाय. या स्पर्धेतील तीन सामन्यांमधला भारताचा हा दुसरा विजय आहे. या विजयासह भारतीय संघानं या स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक दिलीय. अफगाणिस्तानने दिलेल्या 260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 10 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकलाय. 


भारताकडून सलामीवीर हरनूर सिंहनं 74 चेंडूत 65 धावा केल्या. तर, राज बावा 55 चेंडूत 43 धावा करून नाबाद परतला. कौशल तांबेनं 29 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या, तर अंगकृश रघुवंशीने 47 चेंडूत 35 धावांचे योगदान दिलं. अफगाणिस्तानसाठी नूर अहमदनं 10 षटकात 43 धावा देत 4 बळी घेतले. तत्पूर्वी, अफगाणिस्ताननं 4 बाद 259 धावा केल्या होत्या. त्याच्यासाठी अजाज अहमद अहमदझाईनं सर्वाधिक 86 धावांची खेळी केली. तर, कर्णधार सुलेमान सैफी 86 चेंडूत 73 धावा करून बाद झाला.


ट्वीट- 



भारतानं पहिल्या सामन्यात यूएईचा 154 धावांनी पराभव केला होता. तर, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानकडून दोन विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. तीन सामन्यांनंतर 'अ' गटात भारताचे आता 6 गुण झाले आहेत आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-