(Source: ECI/ABP News/ABP Majha)
INDW vs SLW: पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाचा 34 धावांनी विजय
INDW vs SLW 1st T20: डंबुलाच्या रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 34 धावांनी विजय मिळवलाय.
INDW vs SLW 1st T20: डंबुलाच्या रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 34 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय महिला संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून श्रीलंकेसमोर 138 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 20 षटकात 104 धावा करू शकला.
नाणेफेक जिंकून भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जनं सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. तर, शेफाली वर्मा 31 आणि हरमनप्रीत कौर 22 धावा केल्या. त्यानंतर भारताच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. भारतानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 138 धावा केल्या. श्रीलंकेकडून इनोका रणवीरा भेदक गोलंदाजी करत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, ओशादी रणसिंगेनं दोन विकेट्स घेतल्या आणि चामरी अथापट्टूनं एक विकेट्स मिळवली.
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. श्रीलंकेकडून कविशा दिल्लारीनं सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. तिच्या व्यतिरिक्त श्रीलंकेच्या संघातील एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. ज्यामुळं श्रीलंकेच्या 34 धावांनी पराभव झाला. भारताकडून राधा यादवनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, दिप्ती शर्मा, पूजा वस्त्राकरनं आणि शेफाली वर्माला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
श्रीलंकेचा संघ-
चामरी अथुपट्टू (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता मडावी, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकिपर), इनोका रणवीरा, अमा कांचना, ओशादी रणसिंघे, सुगंधिका कुमारी, उदेशिका प्रबोधनी.
भारताचा संघ-
स्मृती मानधना, शफाली वर्मा, सभिनेनी मेघना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड.
हे देखील वाचा-