IND vs ENG 5th Test : शुभमन गिलची एक बालिश चूक, इंग्लंडला लागला जॅकपॉट! लाखमोलाची विकेट गमावली, गौतम गंभीर संतापला, VIDEO
England vs India 5th Test Update : ओव्हलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रंगतदार ठरत आहे.

England vs India 5th Test Update : ओव्हलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रंगतदार ठरत आहे. मात्र या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने फलंदाजीदरम्यान केलेली एक बालिश चूक टीम इंडियावर महागात पडू शकते.
गिलची चूक, इंग्लंडला लागला जॅकपॉट
React. Pick-up. Strike.
— England Cricket (@englandcricket) July 31, 2025
Clinical from Gus Atkinson 👌 pic.twitter.com/aM3RbgBvjp
या कसोटीत टॉस हरल्यानंतर भारताला आधी फलंदाजी करावी लागली. पहिल्या सत्रात पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी भारताने 2 गडी गमावत 72 धावा केल्या होत्या. गिल त्या वेळी 15 धावांवर नाबाद खेळत होता. दुसऱ्या सत्रात खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर गिलने सुरुवात चांगली केली, पण एका रनच्या मोहात पडून त्यांनी आपलं महत्त्वाचं विकेट गमावलं.
एका चुकीने गमावलं विकेट, इंग्लंडला दिलं गिफ्ट
भारताच्या डावातील 28व्या षटकाची सुरुवात इंग्लंडच्या गस ॲटकिन्सनने केली. पहिल्या चेंडूवर गिलने धाव घेतली नाही. दुसऱ्या चेंडूवर मात्र त्यांनी चेंडू पुढे खेळत धाव घेण्यासाठी पळाला. पण गस ॲटकिन्सनने चपळपणा दाखवत चेंडू उचलून थेट स्टंप्सवर फेकला. गिल तोपर्यंत अर्ध्या खेळपट्टीपर्यंत आला होता आणि मागे वळून जाण्यास त्यांच्याकडे वेळच नव्हता. तो 35 चेंडूत 21 धावा करून रन आऊट झाला आणि निराश चेहऱ्याने पॅव्हेलियनकडे परतला. गिल अशा पद्धतीने बाद झालेला पाहून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही नाराज दिसला.
A moment of madness from Shubman Gill!
— England Cricket (@englandcricket) July 31, 2025
Gus Atkinson throws down the stumps with the India captain stranded.
🇮🇳 8️⃣3️⃣-3️⃣ pic.twitter.com/cYa1PUbPAI
टेस्ट कारकिर्दीत दुसऱ्यांदा रन आऊट
ॉशुभमन गिल याच्या टेस्ट कारकिर्दीत दुसऱ्यांदा रन आऊट झाला. याआधी तो मागच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या मालिकेत रन आऊट झाला होता. विशेष म्हणजे, या मालिकेत गिलने पहिल्यांदाच 20 धावांचा टप्पा ओलांडला होता, पण या वेळी तो मोठी खेळी करू शकला नाहीत. याआधी जेव्हा-जेव्हा गिलने इंग्लंडविरुद्ध 20 धावांपलीकडे मजल मारली होती, तेव्हा त्याने शतक झळकावले होते. गिलची ही चूक भारतासाठी निर्णायक ठरू शकते. आता संघाकडून उरलेल्या फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
हे ही वाचा -





















