रोहित शर्माचं नेतृत्व वेगळं कसं ? विश्वचषकाआधी शुभमन गिलने हिटमॅनचं केले तोंडभरुन कौतुक
Shubman Gill On Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामन राजकोट येथे सुरु आहे.
Shubman Gill On Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामन राजकोट येथे सुरु आहे. भारताने सुरुवातीच्या दोन सामन्यात बाजी मारत मालिका खिशात घातली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात शुभमन गिल याने दमदार कामगिरी केली. गिल याने यंदाच्या वर्षात खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. सलामी फलंदाज शुभमन गिल याने आपल्या यशाचे श्रेय कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाला दिलेय. शुभमन गिल याने रोहित शर्माचे तोंडभरुन कौतुक केलेय.
शुभमन गिल याने २०२३ मध्ये खोऱ्याने धावा काढल्या आहेत. यंदाच्या वर्षात गिलने आतापर्यंत १२०० पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. वनडे वर्ल्डकपच्या आधी गिल तुफान फॉर्मात आहे. शुभमन गिल विश्वचषकात भारताची सर्वात मोठी ताकद असल्याचे बोलले जाते. शुभमन गिल याने जिओ सिनेमावर बोलताना आपल्या यशाचे श्रेय रोहित शर्माच्या नेतृत्वाला दिलेय. रोहित शर्मा संघातील सर्व खेळाडूंना खेळाबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतोय, असे गिल म्हणाला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल शुभमन गिल याला विचारले असता तो म्हणाला की, रोहित भावाच्या नेतृत्वाची खास गोष्ट म्हणजे तो खेळाडूंना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतो. खेळाडूंना मैदानावर स्वतःचे निर्णय घेऊ द्या, असेही तो कोचला सांगतो. एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून त्याच्याबद्दलची ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडते.
Shubman Gill said "Rohit Sharma gives a lot of freedom to players, he tells the coaches as well to let the players make their own decisions on the field and the player should be the best judge and that is his best quality as a player & captain". [JioCinema] pic.twitter.com/zEYlnnFiuu
— Johns. (@CricCrazyJohns) September 26, 2023
वर्ल्ड कपसाठी चांगली तयारी -
ऑस्ट्रेलियाविरोधातील वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ विश्वचषकात सहभागी होईल. क्रिकेटच्या महाकुंभ विश्वचषकात भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिविरोधात आठ ऑक्टोबरपासून चेन्नईच्या मैदानातून करणार आहे. विश्वचषकाच्या तयारीबाबत शुबमन गिलला विचारले असता, विश्वचषकाची तयारी चांगली सुरू असल्याचे सांगितले. आशिया कपमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली. या मेगा इव्हेंटसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.
विश्वचषकासाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी, कुलदीप यादव