Ind vs Aus 1st Test : गिल खेळणार की नाही 22 तारखेला ठरणार, पण 'या' पठ्ठ्याचा पर्थ कसोटीत डेब्यू फिक्स; कोचने केला खुलासा!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होत आहे.
Ind vs Aus 1st Perth Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होत आहे. 22 नोव्हेंबरपासून दोन्ही संघ पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर आमनेसामने येतील. दोन्ही संघांकडून अद्याप प्लेईंग इलेव्हन जाहीर करण्यात आलेले नसले तरी भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मार्कल यांनी पाहुण्या संघातील 11 खेळाडूंबाबत मोठा इशारा दिला आहे.
पर्थ कसोटीपूर्वी मॉर्नी मॉर्केलने 21 वर्षीय अष्टपैलू नितीश रेड्डीचे कौतुक केले. नितीश रेड्डी पर्थमध्ये कसोटी पदार्पण करण्याच्या शक्यतेबद्दल इशारा दिला. आंध्र प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी आयपीएल 2024 मधील त्याच्या चमकदार कामगिरीमुळे प्रकाशझोतात आला. नितीशला फर्स्ट क्लासमध्ये केवळ 23 सामने खेळण्याचा अनुभव आहे. पण टीम इंडिया बऱ्याच दिवसांपासून अशाच सीम बॉलिंग ऑलराऊंडरच्या शोधात होती जो परदेश दौऱ्यावर वेगवान गोलंदाजांना मदत करू शकेल.
नितीश रेड्डी यांचे कौतुक करताना मॉर्केल म्हणाले की, तो अश्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्यात अष्टपैलू बनण्याची क्षमता आहे. तो एक असा खेळाडू आहे जो आमच्यासाठी एक टोक हाताळू शकतो, विशेषतः सुरुवातीचे काही दिवस. तो विकेट-टू-विकेट गोलंदाजीही करतो. जगातील कोणत्याही संघाला वेगवान गोलंदाजांना मदत करणारा अष्टपैलू खेळाडू हवा असतो. त्यांचा कसा वापर करतो हे जसप्रीत बुमराहवर अवलंबून असेल.
🗣️🗣️ In terms of leadership, in terms of how he looks at the game and approaches the game, he's a natural leader for me.#TeamIndia Bowling Coach Morne Morkel on @Jaspritbumrah93's leadership qualities.#AUSvIND | @mornemorkel65 pic.twitter.com/TBxjVze8WV
— BCCI (@BCCI) November 20, 2024
गिलच्या दुखापतीबद्दल मोठे अपडेट
मॉर्केलनेही शुभमन गिलच्या दुखापतीबाबत अपडेट दिला. शुभमन गिल लवकरच बरा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 16 नोव्हेंबर रोजी पर्थमधील WACA येथे भारताच्या मॅच सिम्युलेशन दरम्यान स्लिप कॉर्डनमध्ये झेल घेताना गिलला डाव्या हाताच्या अंगठ्याला हेअरलाइन फ्रॅक्चर झाला. या दुखापतीमुळे तो पहिल्या कसोटीतून बाहेर होण्याचा धोका आहे. भारत अ संघाकडून टॉप ऑर्डर बॅकअप म्हणून खेळल्यानंतर एस इंडियाने देवदत्त पडिक्कललाही परत बोलावले आहे. ते म्हणाले की शुभमन गिल दिवसेंदिवस बरा होत आहे. आम्ही कसोटीच्या दिवशी सकाळी निर्णय घेऊ. बिल्ड-अप दरम्यान त्याने मॅच सिम्युलेशनमध्ये चांगली कामगिरी केली, त्यामुळे आशा आहे की तो बरा होईल.
हे ही वाचा -