Shreyas Iyer : कसोटीचं स्वप्न अजूनही पाहतोय, नाहीतर मी पण...! श्रेयस अय्यर असं का म्हणतोय?
काही वर्षीपूर्वी श्रेयस अय्यर हा भारतीय कसोटी संघातील मधल्या फळीचा महत्त्वाचा दुवा मानला जात होता, परंतु...
Shreyas Iyer Ranji Trophy century : काही वर्षीपूर्वी श्रेयस अय्यर हा भारतीय कसोटी संघातील मधल्या फळीचा महत्त्वाचा दुवा मानला जात होता, परंतु गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याची कामगिरी खुपच खराब होती. हीच गोष्ट इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत पाहायला मिळाली आणि त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो फार काही करू शकला नाही. याच कारणामुळे त्याला बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी संघातून वगळण्यात आले. अय्यरची न्यूझीलंड मालिकेसाठीही निवड झालेली नाही. अशा परिस्थितीत हा खेळाडू रणजी करंडक खेळत असून त्याने शनिवारी महाराष्ट्राविरुद्ध उत्कृष्ट खेळी खेळली आणि तीन वर्षांनंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावले.
मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने महाराष्ट्राच्या गोलंदाजांची धुलाई करत 190 चेंडूत 142 धावांची खेळी केली. यादरम्यान श्रेयसच्या बॅटमधून 12 चौकार आणि चार षटकारही आले. या खेळीपूर्वी श्रेयसने 2021 साली कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शेवटचे शतक झळकावले होते, जो त्याचा पदार्पण कसोटी सामना होता.
शतकीय खेळीनंतर श्रेयस अय्यरने पत्रकारांशी संवाद साधला आणि म्हणाला, "बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करून शतक झळकावणं हे विशेष आहे. साहजिकच दुखापतींमुळे थोडा नाराज झालो होतो, पण बराच काळ लोटला आहे. आता शतक झळकावल्यानंतर ही नक्कीच चांगली भावना आहे."
श्रेयस पुढे म्हणाला की, अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यास उत्सुक आहे आणि म्हणूनच मी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. नाहीतर मी काही कारण सांगून बाहेर बसलो असतो. दीर्घ फॉरमॅटमध्ये मी माझ्या भावनांकडे लक्ष दिले आणि गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत. पण मी सध्या चांगल्या ठिकाणी आहे. मला जे करायचे आहे ते मी करत आहे.
Shreyas Iyer said "I am absolutely keen for a comeback but yes, as we say, control the controllable, keep performing & participating as much as possible". [Gaurav Gupta from TOI - Talking about the Test comeback] pic.twitter.com/Z8MVfr0iuT
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2024
श्रेयस अय्यरला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्येही स्थान मिळवणे कठीण दिसत आहे. दुसऱ्या डावातही त्याला संधी मिळाली तर त्याला भविष्यातही अशीच कामगिरी करावी लागेल, तरच काहीशी शक्यता निर्माण होईल.
हे ही वाचा -