Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने रस्त्यावरच्या गरीब महिलेला कितीची नोट काढून दिली? बघा VIDEO
Shreyas Iyer Video Viral : श्रेयस अय्यरला देशात आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये कोण ओळखत नाही? आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकणारा श्रेयस अय्यर मैदानाबाहेरही आपल्या वागण्याने सर्वांची मने जिंकताना दिसत आहे.
Shreyas Iyer News : श्रेयस अय्यरला देशात आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये कोण ओळखत नाही? आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकणारा श्रेयस अय्यर मैदानाबाहेरही आपल्या वागण्याने सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका गरीब महिला मदत करताना दिसत आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.
श्रेयस अय्यरने चाहत्यांना दिले ऑटोग्राफ
अनेक महान क्रिकेटपटूंचे जन्मस्थान असलेले मुंबई शहर श्रेयस अय्यरचेही घर आहे. अय्यर वांद्रे येथील एका पॉश भागात असलेल्या सलूनमधून बाहेर येताना दिसला. तो बाहेर येताच काही चाहत्यांनी त्याला घेरायला सुरुवात केली. एका चाहत्याने बॅट आणि त्याच्यासोबत आणलेल्या जर्सीवर ऑटोग्राफ अय्यरचा मागितला, जो त्याने आनंदाने दिला. पण यानंतर जे घडले ते सर्वांसाठी खूप खास होते.
श्रेयस अय्यरने महिला केली मदत
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की तो सलूनमधून बाहेर येताच काही वस्तू विकणारी गरीब महिला श्रेयसकडे मदत मागत आहे. ती महिला अय्यर यांच्याकडे गेली आणि त्यांच्याशी बोलू लागली आणि नंतर गाडीपर्यंत त्यांच्या मागे गेली. यादरम्यान श्रेयसने आधी महिलेला धीर धरण्यास सांगितले आणि त्यासोबतच त्याने गरीब महिलेला तंबाखू खाऊ नको असे सांगितले. यानंतर त्याने महिलेला काही पैसे दिले. ते किती पैसे होते हे नक्की कळलं नाही. मग महिलेने श्रेयसशी हस्तांदोलन केले.
Shreyas Iyer helping the Poor People at Bandra. [Voompla IG]
— Johns. (@CricCrazyJohns) August 18, 2024
- The man with the Golden heart. pic.twitter.com/Y4Fwz2Gey5
नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर श्रेयस अय्यर भारतीय संघाचा भाग होता. मात्र, एकदिवसीय मालिकेत त्याची कामगिरी काही विशेष राहिली नाही. आता तो दुलीप ट्रॉफीमध्ये भारत डी संघाचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी त्याने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते.
संबंधित बातमी :
Vinesh Phogat Video : विनेश फोगाटची प्रकृती खालावली अन् अचानक पडली बेशुद्ध...; कार्यक्रमादरम्यान मग काय घडलं?