एक्स्प्लोर

Ind vs Ban Test : श्रेयस अय्यर-सूर्या पहिल्या परीक्षेत नापास, बांगलादेशविरुद्ध होणार पत्ता कट?

India vs Bangladesh Test : बांगलादेशविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होण्यास अजून वेळ आहे. त्यापूर्वी, काही खेळाडूंना आपला दावा मांडण्याची संधी आहे...

India vs Bangladesh Test : बांगलादेशविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होण्यास अजून वेळ आहे. त्यापूर्वी, काही खेळाडूंना आपला दावा मांडण्याची संधी आहे, त्यापैकी दोन खेळाडू पहिल्या परीक्षेत नापास झाले आहेत. 

कसोटी मालिकेच्या तयारीसाठी बुची बाबू स्पर्धेत भाग घेत असलेला मुंबईचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सपशेल अपयशी ठरला. कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सूर्यकुमार यादवलाही मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले आहे. या दोन फलंदाजांशिवाय मुंबईचे बाकीचे फलंदाज अपयशी ठरले.

कोईम्बतूर येथे 27 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सामन्यात मुंबई आणि टीएनसीए-XI आमनेसामने आहेत. टीएनसीए-11 ने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 379 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी मुंबईने पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला पण सलामीवीर दिव्यांश सक्सेना वगळता एकाही फलंदाजाला आपली ताकद दाखवता आली नाही. टीएनसीएचा कर्णधार आर साई किशोरने मुंबईच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा 8 विकेट गमावून केवळ 181 धावा करता आल्या.

सूर्या-श्रेयसची बॅट शांत 

कसोटी संघात स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार असलेल्या स्टार फलंदाज श्रेयस अय्यरवर सर्वाधिक नजरा खिळल्या होत्या. पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला श्रेयस पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि अवघ्या 3 चेंडूत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला केवळ 2 धावा करता आल्या. श्रेयस आऊट झाल्यानंतर सूर्या क्रीझवर आला आणि त्याच्याच शैलीत येताच त्याने वेगवान फलंदाजी सुरू केली. त्याच्या आणि दिव्यांशमध्ये 40 धावांची भागीदारी झाली, त्यापैकी 30 धावा सूर्याच्या होत्या. 

खडतर परिस्थितीत अडकलेल्या मुंबईला वाचवून आपली दावेदारी मांडण्याची सुर्याकडे चांगली संधी होती, पण तोही पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्याने 38 चेंडूत 30 धावांची खेळी खेळली. याशिवाय युवा फलंदाज मुशीर खानलाही केवळ 16 धावा करता आल्या.

बांगलादेशविरुद्ध होणार पत्ता कट?

हा फक्त पहिला डाव असून या सामन्यात त्याला दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळणार आहे. याशिवाय आगामी काळात ते दुलीप ट्रॉफीमध्येही खेळताना दिसणार आहे. म्हणजे निवड समितीवर छाप पाडण्याची त्याच्याकडे अजूनही पुरेशी संधी आहे.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन
वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन
कांद्याच्या दरात वाढ होणार, बळीराजाला दिलासा मिळणार! निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातील चालना मिळणार
कांद्याच्या दरात वाढ होणार, बळीराजाला दिलासा मिळणार! निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातील चालना मिळणार
Jyoti Mete : शरद पवारांसह अजित पवारांशी बोलणी सुरु, ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढवणार?  
Jyoti Mete : शरद पवारांसह अजित पवारांशी बोलणी सुरु, ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढवणार?  
Eid a milad 2024 Holiday: मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार
मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AMABP Majha Headlines : 07 AM  : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सICC Women's T20 World : Tejaswini Pandit Ek Number Movie  : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन
वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन
कांद्याच्या दरात वाढ होणार, बळीराजाला दिलासा मिळणार! निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातील चालना मिळणार
कांद्याच्या दरात वाढ होणार, बळीराजाला दिलासा मिळणार! निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातील चालना मिळणार
Jyoti Mete : शरद पवारांसह अजित पवारांशी बोलणी सुरु, ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढवणार?  
Jyoti Mete : शरद पवारांसह अजित पवारांशी बोलणी सुरु, ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढवणार?  
Eid a milad 2024 Holiday: मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार
मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
Embed widget