(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुरलीधरन, मलिक ते मॅक्सवेल; विदेशी क्रिकेटर्संनी भारतीय मुलींसोबत थाटलाय संसार
विदेशी क्रिकेटर्संनी भारतीय मुलींसोबत थाटलाय संसार, शोएब मलिक ते मुथय्या मुरलीधरन या क्रिकेटर्सचा समावेश आहे.
Foreign Cricketers Who Married Indian Girl : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने गतवर्षी भारतीय वंशाची मुलगी विनी रमनशी लग्न केले. भारतीय मुलीशी लग्न करणारा ग्लेन मॅक्सवेल एकमेव क्रिकेटर नाही. यामध्ये अनाकांचा समावेश आहे. आज आपण पाच विदेशी क्रिकेटर्सची माहिती पाहणार आहोत, ज्यांनी भारतीय मुलीसोबत संसार थाटला आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. शोएब मलिक ते मुथय्या मुरलीधरन या क्रिकेटर्सचा समावेश आहे. पाहूयात त्याबाबत सविस्तर...
कोण कोणत्या क्रिकेटर्सनी भारतीय मुलींसोबत थाटला संसार ?
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकही भारताचा जावई आहे. शोएब मलिक याने भारतीय टेनिस स्टार सानिया मार्झा हिच्यासोबत लग्न थाटले. 2010 मध्ये शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचे लग्न झाले होते. त्यांना गोंडस असा मुलगा आहे. गेल्या महिन्यात शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा उडाल्या होत्या. या वृत्ताचे या दोघांकडून खंडन करण्यात आले.
श्रीलंकेचा महान फिरकीपट्टू मुथय्या मुरलीधरन याचाही या यादीत समावेश आहे. मुरलीधरन याने भारतीय मुलगी मधिमलार रामामूर्थि हिच्यासोबत 2005 मध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आहे.
याशिवाय गेल्या वर्षी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने भारतीय मुलीशी लग्न केले होते. हसन अलीच्या पत्नीचे नाव सामिया आरजू असे आहे. सामिया अराजू ही भारताची रहिवासी आहे.
मॅक्सवेलआधी शॉन टेट भारताचा जावई
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटही भारताच जावई आहे. त्याच्या पत्नीचे नाव मासूम शिंगा आहे. मासूम शिंगा ही भारताची रहिवासी आहे. मासूम शिंगा एक मॉडेल आणि अँकर आहे. शॉन टेट आणि मासूम शिंगा यांची 2013 मध्ये एंगेजमेंट झाली होती. या जोडप्याने 2014 मध्ये सात फेरे घेत संसार थाटला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शॉन टेट आणि मासूम शिंगा 2007 पासून रिलेशनशिपमध्ये होते. सात वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर शॉन टेट आणि मासूम शिंगा यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. शॉन टेट याने ऑस्ट्रेलियाशिवाय आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. त्याशिवाय शॉन टेट जगभरातील अनेक टी-20 लीगमध्ये खेळला आहे. शॉन टेट अनेक संघांच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे.