Pakistan vs Bangladesh Test WTC points : पाकिस्तान संघाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेश क्रिकेट संघाला एकापाठोपाठ दोन मोठे धक्के बसले आहेत. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत स्लो ओव्हररेटमुळे पाकिस्तान आणि बांगलादेशचे गुण कमी केले.
त्याचवेळी आता आसीसीने बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनवर मोठी कारवाई केली आहे. शकीब अल हसन त्याच्या कामगिरीसाठी तसेच त्याच्या कृत्यांमुळे चर्चेत राहतो. अलीकडेच त्याच्यावर हत्येचा आरोप असून ढाका येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याला आयसीसीकडूनही मोठा धक्का बसला आहे.
शाकिब अल हसनला मोठी शिक्षा
पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडी कसोटी दरम्यान आयसीसी आचारसंहितेचा स्तर 1 भंग केल्याबद्दल शकीब अल हसनला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. शकीबने ICC आचारसंहितेच्या कलम 2.9 चे उल्लंघन केले आहे, जे 'आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडू, खेळाडूचे सपोर्ट स्टाफ, अंपायर, मॅच रेफरी किंवा इतर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या जवळ अयोग्य वर्तन करण्यास मनाई करते.
पण या सामन्यादरम्यान शाकिबने रागाच्या भरात मोहम्मद रिझवानकडे चेंडू फेकला होता. यासाठी आयसीसीने त्याला दंड ठोठावला आहे. शाकिबने आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नव्हती.
बांगलादेश-पाकिस्तानलाही ठोठावण्यात आला दंड
आयसीसीने पाकिस्तान आणि बांगलादेश संघालाही दंड ठोठावला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानला मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतूनही गुण वजा करण्यात आले आहेत. बांगलादेशला मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
शाकिबची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
37 वर्षीय अनुभवी खेळाडू शाकिबने बांगलादेशकडून आतापर्यंत 67 कसोटी, 247 एकदिवसीय आणि 129 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात शाकिबने कसोटीत 4505 धावा केल्या आहेत आणि 237 बळी घेतले आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाकिबच्या नावावर 7570 धावा आणि 317 विकेट आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 2551 धावा आणि 149 विकेट घेतल्या आहेत.
हे ही वाचा :
Pakistan WTC 2025 : चुकीला माफी नाही... पाकिस्तानला बसला दणका; ICCने घेतली मोठी ॲक्शन
टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तरी स्टार स्पोर्ट्सचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान! ICCकडे केली मोठी मागणी