R Ashwin On IndiGo Airlines : भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने नुकतीच इंडिगो एअरलाइनबद्दल धक्कादायक खुलासा केला. सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करताना त्यांनी आरोप केला की इंडिगो एअरलाइन्स प्रवाशांनी आधीच बुक केलेल्या सीटकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. अश्विनने एअरलाईनला फटकारले आणि हा एक स्कॅम असल्याचे वर्णन केले.
अश्विनने इंडिगो एअरलाइन्सवर केली टीका
अश्विनने ट्विटरवर लिहिले, "ही समस्या आता इंडिगो एअरलाइन्समध्ये सामान्य होत चालली आहे. माझा अलीकडचा अनुभव खूपच वाईट होता. थर्ड पार्टी बुकिंग प्लॅटफॉर्मवरून बुकिंग केल्यानंतर, एअरलाइनने माझी बुक केलेली सीट दुसऱ्याला दिली. हा स्कॅम आहे की नाही हे माहित नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, आम्ही पैसे दिले तरी आम्हाला आमची बुक केलेली सीट मिळणार नाही.
हर्षा भोगले यांनीही केली इंडिगो एअरलाइन्सवर टीका
अश्विनची ही तक्रार अशा वेळी आली आहे, जेव्हा प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाइन्सवर टीका केली होती. त्यावेळी हर्षा यांनी ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. भोगले यांनी एक प्रसंग सांगितला होता की, एका वृद्ध जोडप्याने त्यांना जास्त चालावे लागू नये म्हणून चौथ्या रांगेत सीट बुक केली होती. त्यांनी आधीच त्या सीटसाठी पैसे दिले होते. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची जागा १९व्या रांगेत बदलण्यात आली. या बदलामुळे वृद्ध व्यक्तीला कॉरिडॉरमधून चालताना खूप त्रास झाला.
खरं तर, हा घोटाळा नेमका आहे तरी काय, हे अद्याप कोणालाही समजलेले नाही. पण या गोष्टीमुळे मनस्ताप मात्र नक्कीच होत आहे.
हे ही वाचा :