India vs Pakistan in World Test Championship final : अलीकडेच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तानला मोठा फटका बसला. या पराभवानंतर पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणे कठीण दिसत आहे. मात्र, या समीकरणानुसार पाकिस्तान अजूनही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे जाणून पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल भारत आणि पाकिस्तान भिडू शकतात.


भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेला पाकिस्तान आठव्या स्थानावर पोहोचला आहे. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचण्याच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे, तर पाकिस्तानसाठी अंतिम फेरी गाठणे खूप कठीण दिसत आहे. 6 पैकी फक्त 2 सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानची विजयाची टक्केवारी फक्त 30.56 आहे.


पण, पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​सायकलमध्ये अजून 8 कसोटी खेळायच्या आहेत. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला सर्व 8 सामने जिंकावे लागतील. मात्र, पाकिस्तानसाठी हे सोपे नसेल कारण त्यांना वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या विरोधी संघांविरुद्ध खेळायचे आहे.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होऊ शकते फायनल


उल्लेखनीय आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाने 9 पैकी 6 सामने जिंकले, 2 हरले आणि 1 सामना अनिर्णित राहिला. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने 12 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 8 सामने जिंकले, 3 हरले आणि 1 सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 62.50 आहे.


नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जाणार आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी पाच सामन्यांची ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2021-23 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना देखील भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.


हे ही वाचा : 


Shikhar Dhawan : मोठी घोषणा! निवृत्तीनंतर 'गब्बर' पुन्हा करणार क्रिकेटमध्ये पुनरागमन; 'या' लीगमध्ये घालणार धुमाकूळ


टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकला तरी स्टार स्पोर्ट्सचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान! ICCकडे केली मोठी मागणी


Rohit Sharma IPL 2025 : मेगा लिलावापूर्वी मोठी अपडेट; प्रीती झिंटाच्या ताफ्यात जाणार रोहित शर्मा? 'या' वक्तव्यामुळे रंगली चर्चा