Samit Dravid Maharaja T20 League 2024 : महाराजा टी-20 लीग सध्या कर्नाटकात सुरू आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समित या टी-20 लीगमध्ये खेळताना दिसत आहे. समित या लीगमध्ये म्हैसूर वॉरियर्सकडून खेळत आहे. या लीगमध्ये चमकदार कामगिरी करून समित द्रविड आयपीएल लिलावापूर्वी आपला दावा मांडू शकेल, अशी अपेक्षा होती. पण आत्तापर्यंत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
महाराजा टी-20 लीगमध्ये समित द्रविडचा 'फ्लॉप' शो
समित महाराजा टी-20 लीगमध्ये करुण नायरच्या नेतृत्वाखाली म्हैसूर वॉरियर्सकडून खेळताना दिसत आहे. एकीकडे करुण नायरने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे, तर दुसरीकडे समितला विशेष काही करता आलेले नाही. आतापर्यंत त्याने 5 सामने खेळले आहेत. या लीगमध्ये त्याने 5, 12, 2, 16 आणि 33 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी केवळ 13.5 आहे.
समित एक शॉट सोशल मीडियावर झाला होता व्हायरल
महाराजा टी-20 लीग 2024 मधील पहिला सामना म्हैसूर वॉरियर्स आणि गुलबर्गा मिस्टिक्स यांच्यात खेळला गेला. समितच्या संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, मात्र त्याच्या एका शॉटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुलबर्गा मिस्टिक्सविरुद्ध त्याने लेग साइडवर दमदार षटकार ठोकला होता. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्या या शॉटचे कौतुक केले. त्याचा हा शॉट सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.
आयपीएल लिलावापूर्वी दावा झाला कमकुवत
समित द्रविडला या लीगमध्ये चमकदार कामगिरी करून आयपीएल लिलावात स्वत:ला सादर करण्याची संधी होती. मात्र त्याने आपल्या कामगिरीने निराशा केली आहे. मात्र, त्यानंतरही अनेक संघ त्याच्यावर सट्टा लावू शकतात. समित द्रविड कर्नाटकच्या अंडर-19 संघाकडूनही खेळला आहे. त्याने 2023-24 कूचबिहार ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता. याशिवाय, लँकेशायर संघाविरुद्धच्या तीन दिवसीय सामन्यात तो KSCA XI चा देखील भाग होता.
हे ही वाचा :
टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकला तरी स्टार स्पोर्ट्सचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान! ICCकडे केली मोठी मागणी