IND vs WI, 2nd ODI, Toss Update : आजही नाणेफेक वेस्ट इंडीजच्याच बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली असून पहिल्या सामन्याप्रमाणे आजही नाणेफेक विंडीजने जिंकली आहे. पण यावेळी मात्र त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
India vs West Indies Toss Update : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे आजही वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली आहे. पण यावेळी मात्र त्यांनी प्रथम गोलंदाजी न घेता आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत मालिकेत 1-0 च्या आघाडीवर असल्याने आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडीज बरोबरी करुन मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. विशेष म्हणजे आज भारताकडून वेगवान युवा गोलंदाज आवेश खान एकदिवसीय सामन्यात पदार्पण करत असून प्रसिध कृष्णाच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे.
West Indies have won the toss and elect to bat first in the 2nd ODI against #TeamIndia
— BCCI (@BCCI) July 24, 2022
Live - https://t.co/EbX5JUciYM #WIvIND pic.twitter.com/u728pmLDR2
हा सामना पार पडणाऱ्या मैदानातच पहिला सामना खेळवण्यात आला. विशेष म्हणजे दोन्ही संघानी 300 पार धावसंख्या नेली. केवळ 3 धावांनी भारत जिंकला. पण एक चुरशीचा सामना आज पाहायला मिळाला. दरम्यान मैदानाची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अधिक फायदेशीर असून त्यांना जास्त विकेट मिळून ते धावाही रोखू शकतात. दरम्यान यामुळे भारतीय गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहलकडे अधिक असेल. मैदानाची खेळपट्टी एक मोठी धावसंख्या देखील संघाना मिळवून देऊ शकते. त्यामुळे पहिल्या सामन्याप्रमाणे एक मोठी धावसंख्या होऊ शकते.
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, जाडेजा, संजू सॅमसन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, आवेश खान, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडीज संघ - निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, हेडन वॉल्श, रोमारियो शेफर्ड, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स
हे देखील वाचा-
- Shikhar Dhawan : धवनचं शतक हुकलं, सहाव्यांदा झाला 'नर्व्हस 90' चा शिकार, पण एक खास रेकॉर्ड केला नावावर
- ICC T20 World Cup 2022 : 'विश्वचषकात भारताला कोहलीची गरज पडणार', अजित आगरकरने सांगितलं कारण
- WI Vs IND: अखेरच्या षटकात 15 धावा रोखण्याचं आव्हान, दोन आक्रमक फलंदाज क्रिजवर; त्यांनाही पुरून उरला मोहम्मद सिराज!