Sarfaraz Khan News : कसोटी संघातून डावलल्यावर सरफराज खानची इंग्लंडमध्ये तोडफोड बॅटिंग; निवडकर्त्यांना दिलं प्रत्युत्तर, वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळणार?
Sarfaraz Khan IND Vs ENG Test Series : सरफराज खानला संघातून वगळले, पण इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडले.

Sarfaraz Khan England Lions vs India A : जेव्हा टीम इंडियाची कसोटी संघ निवडली जाते, तेव्हा नेहमीच वादविवाद सुरू होतात. बऱ्याच वेळा एखाद्या खेळाडूची दुर्लक्ष केलेली निवड चर्चेचा मुद्दा बनतो. सरफराज खान हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अपूर्व कामगिरी करणाऱ्या सरफराजला कसोटी संघात संधी मिळत नाही, आणि त्याबद्दल चाहते तसेच माजी खेळाडू वारंवार बीसीसीआयवर नाराजी व्यक्त करत आले आहेत.
मात्र सरफराज खानने यावर कुठलाही बोलबाला न करता, आपल्या बॅटनेच निवडकर्त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत अ संघाकडून खेळताना त्याने 118 चेंडूंमध्ये 92 धावा चोपल्या. इंग्लंडच्या सीम-अनुकूल वातावरणात, कँटरबरीच्या सेंट लॉरेन्स ग्राउंडवर त्याने ही तुफानी फटकेबाजी केली. या दरम्यान, त्याने १३ चौकार मारले.
SARFARAZ KHAN MISSED A DESERVING HUNDRED..!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) May 30, 2025
- 92 runs from 119 balls against England Lions, What a knock after being Dropped from the Test team, Incredible from Sarfu. 👌 pic.twitter.com/PLlwZYMh1r
सरफराज खानकडे सातत्याने दुर्लक्षित
बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी काही दिवसांपूर्वी इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या १८ सदस्यीय संघात सरफराज खानची निवड झाली नव्हती. गेल्या वर्षी त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार पदार्पण केले आणि नंतर न्यूझीलंडविरुद्धही शानदार शतक झळकावले असल्याने यावर बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि आता त्याची इंग्लंडसाठी निवड झाली नाही.
गंभीरकडून दखल घेण्याची गरज
सध्या कसोटी संघाचे दायित्व नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडे आहे. सरफराजच्या या खेळीमुळे त्यांच्यावर दडपण येण्याची शक्यता आहे की, इतका सातत्यपूर्ण फलंदाज संघाबाहेर का आहे? सरफराज खानची ही खेळी फक्त एक इनिंग नव्हे, तर ती एक निवडकर्त्यांना दिलेली जाहीर घोषणा आहे, “मी तयार आहे.” आगामी कसोटी मालिकांसाठी संघाची घोषणा झाली आहे, पण संघात वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे.
हे ही वाचा -





















