Team India Squad vs West Indies : नवा ट्विस्ट! टीम इंडियातून करुण नायरचा पत्ता कट; तब्बल 17 किलो वजन कमी करणाऱ्या मुंबईकराला वेस्ट इंडिजविरुद्ध मिळणार संधी?
Sarfaraz Khan Team India Squad For West Indies Test Series : आशिया कप 2025 संपल्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.

Team India Squad For West Indies Test Series : आशिया कप 2025 संपल्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. आशिया कपचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार असून, कसोटी मालिकेची सुरुवात 2 ऑक्टोबरपासून होईल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. ज्यामध्ये टीम इंडियामध्ये काही जुन्या खेळाडूंना परतण्याची संधी मिळू शकते. त्यामध्ये सरफराज खानच्या पुनरागमनाची शक्यता आहे.
सरफराज खानने तब्बल 17 किलो वजन केले कमी (Cricketer Sarfaraz Khan loses 17 kgs in 2 months)
मिडल ऑर्डरच्या शर्यतीत आता एक नवा ट्विस्ट आला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार, सरफराज खान 29 सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे फिट होणार असून निवडीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की करुण नायर संघात पुन्हा संधी मिळणार की मग देवदत्त पडिक्कल आणि सरफराज खान परतणार?
सरफराज खान बराच काळ संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपल्या खेळाबरोबरच त्याने फिटनेसकडेही विशेष लक्ष दिले आहे. अलीकडेच सरफराज खानने तब्बल 17 किलो वजन कमी करून सगळ्यांना थक्क केले होते. याबाबतची माहिती स्वतः सरफराजनेच दिली होती. त्यामुळे तो पुन्हा टीम इंडियामध्ये निवडीसाठी सज्ज आहे. अशी चर्चा रंगली आहे की वेस्ट इंडीज मालिकेसाठी तो खेळू शकतो.
🚨 GOOD NEWS FOR TEAM INDIA 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) September 24, 2025
Sarfaraz Khan is likely to be fit by September 29th, might be available for the selection for West Indies Test series. [Devendra Pandey] pic.twitter.com/tZa09jmyDq
रोहित शर्मासोबत प्रॅक्टिस (Sarfaraz Khan practices with Rohit Sharma)
अलीकडेच सरफराज खानने आपल्या प्रॅक्टिस सेशनचा एक फोटो शेअर केला होता. यात तो भारतीय कर्णधार रोहित शर्माकडून टिप्स घेताना दिसला. रोहितने सरफराजला सरावादरम्यान अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या.
सरफराज खान कधी खेळला होता शेवटचा कसोटी सामना? (When Sarfaraz Khan play last Test match?)
सरफराज खानने भारतासाठी पहिली कसोटी इंग्लंडविरुद्ध 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान खेळली होती. त्यानंतर काही संधी मिळाल्यानंतर त्याने शेवटचा कसोटी सामना 1 नोव्हेंबर 2024 रोजी खेळला होता. जर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याला पुन्हा संधी मिळाली, तर जवळपास 332 दिवसांनंतर तो कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल.
हे ही वाचा -





















