Sanju Samson : आशिया कपपूर्वी टीम इंडियाच्या सलामीवीर तळपला! फक्त इतक्या चेंडूंत ठोकले धमाकेदार अर्धशतक
आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

Sanju Samson News Before Asia Cup 2025 : आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी अनेक स्टार खेळाडूंची नावं चर्चेत आहेत, त्यामुळे निवड समितीसमोर 15 खेळाडूंची निवड करणे अवघड जाणार आहे. अशातच एका खेळाडूने तुफानी खेळीने आपली दावेदारी पक्की केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केरळ क्रिकेट असोसिएशनने (KCA) आयोजित केलेल्या फ्रेंडली सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनने अफलातून खेळी केली.
संजू सॅमसनचा 'बॅटिंग' शो
Sanju Super Samson with another stunning catch, this time in slip 🚀 pic.twitter.com/uWdsdWF1XR
— Sanju Samson Fans Page (@SanjuSamsonFP) August 15, 2025
संजू सॅमसनची ही खेळी अशा वेळी आली आहे, जेव्हा त्याच्या IPL भवितव्याबाबत चर्चांना उधाण आलेले आहे. संजूने राजस्थान रॉयल्ससोबतचा करार संपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स त्याला आपल्या संघात घेण्यास उत्सुक आहेत. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर स्वातंत्र्यदिनानिमित्त हा सामना खेळला गेला. यात संजूने KCA सेक्रेटरी इलेव्हनच्या नेतृत्वात अर्धशतक ठोकत आपल्या संघाला रोमांचक विजय मिळवून दिला.
शेवटच्या षटकात नाट्यमय विजय
या फ्रेंडली टी-20 सामन्यात संजू सॅमसनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 36 चेंडूंमध्ये 54 धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. आयपीएल 2025 नंतरचा हा त्याचा पहिलाच सामना होता. संजूच्या नेतृत्वाखालील सेक्रेटरी इलेव्हनने 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत शेवटच्या षटकात केवळ एक गडी राखून विजय मिळवला. अखेरच्या चेंडूवर वेगवान गोलंदाज बासिल थम्पीने षटकार ठोकत संघाला यश मिळवून दिले.
Sanju Samson captained his team with a strong performance in a chase during a KCA exhibition match held at the Greenfield Cricket Stadium in Thiruvananthapuram 🏏#SanjuSamson #KCA #CricketTwitter pic.twitter.com/BMbdyUZgjd
— InsideSport (@InsideSportIND) August 16, 2025
या सामन्यात संजूचा सहकारी विष्णु विनोदनेही 69 धावांची उत्तम खेळी करून संघाला जोरदार सुरुवात करून दिली. दुसरीकडे KCA प्रेसिडेंट इलेव्हनचे नेतृत्व करणाऱ्या सचिन बेबीच्या संघाने 184 धावा केल्या. यात रोहन कुन्नुमलचे 60 आणि अभिजीत प्रवीणचे 47 धावांचे योगदान होते. मात्र, शराफुद्दीनच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे त्यांची वाटचाल कठीण झाली, कारण त्याने 3 गडी बाद केले.
हे ही वाचा -





















