एक्स्प्लोर

Sanju Samson : ... तर नवव्या स्थानावर फलंदाजीसाठी तयार, डाव्या हातानं गोलंदाजी देखील करेन, संजू सॅमसनचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मोठं वक्तव्य

Sanju Samson : संजू सॅमसननं ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मोठं वक्तव्य केलं आहे. नवव्या स्थानावर देखील खेळण्यास तयार असल्याचं तो म्हणाला.

Sanju Samson नवी दिल्ली: भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 19 ऑक्टोबरपासून जाणार आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळले जातील. संजू सॅमसनला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी 20 संघात स्थान देण्यात आले आहे. आशिया चषक 2025 मध्ये संजू टीमचा भाग होता. संजूनं  आशिया चषकात चांगल्या धावा केल्या. संजू सॅमसनला आशिया चषकात ओमानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आलं होतं. आशिया चषकात संजूच्या फलंदाजीच्या क्रमात अनेक बदल दिसून आले. संजूने टीम इंडियामध्ये आपल्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल भूमिका मांडत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना थेट संदेश दिला आहे.

Sanju Samson : संजू नेमकं काय म्हणाला?

आशिया चषक 2025 यावेळी टी20 फॉरमॅटमध्ये खेळला गेला. शुभमन गिल बऱ्याच दिवसांपासून भारताच्या टी20 टीममधून बाहेर होता, तेव्हा संजू सॅमसन टीमसाठी सलामीला फलंदाजीला येत होता. पण, गिल परत येताच संजूला मधल्या फळीत आणले गेले आणि शुभमन गिल, अभिषेक शर्मा हे दोघे सलामीवीर बनले. आशिया चषकात संजू सॅमसनच्या फलंदाजीच्या क्रमात अनेकवेळा बदल दिसून आले.

संजू सॅमसनने CEAT क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्समध्ये सांगितले की, 'जर तुम्ही मला 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सांगितले किंवा मला लेफ्ट-आर्म-स्पिन गोलंदाजीसाठी सांगितले किंवा मला देशासाठी कोणतीही भूमिका दिली, तर मला त्यात काहीही वाईट वाटत नाही.'

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 वर्ष पूर्ण

संजू सॅमसन पुढे म्हणाला, 'मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि मी या 10 वर्षात फक्त 40 सामने खेळले आहेत. खरं सांगायचं तर, हे आकडे सर्व गोष्टी सांगत नाहीत, पण आज मी जो माणूस बनलो आहे, त्याचा मला अभिमान आहे. मी ज्या आव्हानांना सामोरे गेलो, त्याचाही मला अभिमान आहे. आता मी बाहेरील चर्चेऐवजी माझ्या आतल्या आवाजावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.'

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा टी 20 संघ

सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार,तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी,शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर

पाच सामन्यांची टी 20 मालिका

29 ऑक्टोबर - पहिली टी20 (कॅनबेरा)
31 ऑक्टोबर - दुसरी टी20 (मेलबर्न)
2 नोव्हेंबर - तिसरी टी20 (होबार्ट)
6 नोव्हेंबर - चौथी टी20 (गोल्ड कोस्ट)
8 नोव्हेंबर - पाचवी टी20 (ब्रिसबेन)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammad Azharuddin: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
Kerala High Court: तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
Phaltan Doctor death: फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळचा अधिकारी नेमला, मेहबुब शेख यांचा आरोप
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेला अधिकारी जयकुमार गोरेंचा निष्ठावंत, मेहबुब शेख यांचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu : 'कर्जमाफीत कटाकारस्थान झाल्यास कोणालाही सोडणार नाही', सरकारला इशारा
Raigad Politics: 'वेळ येईल तेव्हा हिशेब चुकता करू', Sunil Tatkare यांचा Shiv Sena ला थेट इशारा
Mahendra Dalavi : रोहा कुणाची मालकी नाही, आमदार महेंद्र दळवींचा निशाणा
Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांनी पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप
Mumbai Hostage Case : रोहित आर्य एकटा नव्हता, संपूर्ण टीमच सामील होती?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammad Azharuddin: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
Kerala High Court: तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
Phaltan Doctor death: फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळचा अधिकारी नेमला, मेहबुब शेख यांचा आरोप
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेला अधिकारी जयकुमार गोरेंचा निष्ठावंत, मेहबुब शेख यांचा आरोप
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
Ajit Pawar: दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
Rupali Chakankar Statement Controversy: सडकून टीकेच्या धनी ठरलेल्या रुपाली चाकणकरांना झटका बसणार? फलटणमध्ये नेमकं म्हणाल्या तरी काय ज्यामुळे थेट दादाच म्हणाले, मी सहमत नाही!
सडकून टीकेच्या धनी ठरलेल्या रुपाली चाकणकरांना झटका बसणार? फलटणमध्ये नेमकं म्हणाल्या तरी काय ज्यामुळे थेट दादाच म्हणाले, मी सहमत नाही!
Bacchu Kadu Brothers : कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडूंच्या मोठ्या भावांनी व्यक्त केली भावना; म्हणाले, गाफील राहू नका., कर्जमाफी संदर्भात सरकारवर बारीक लक्ष ठेवा
कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडूंच्या मोठ्या भावांनी व्यक्त केली भावना; म्हणाले, गाफील राहू नका., कर्जमाफी संदर्भात सरकारवर बारीक लक्ष ठेवा
Embed widget