एक्स्प्लोर

Sanju Samson Record : 'बेस्ट इंडियन विकेटकिपर...' धोनीला जे जमलं नाही ते संजूने करून दाखवलं, गौतम गंभीरचं ट्वीट व्हायरल!

Ind vs Sa 1st T20 : सलामीवीर संजू सॅमसनच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दमदार सुरुवात केली.

Sanju Samson Record Ind vs Sa 1st T20 : सलामीवीर संजू सॅमसनच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दमदार सुरुवात केली. भारताने डरबन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने 20 षटकांत 8 गडी गमावून 202 धावा केल्या. 

प्रत्युत्तरात चक्रवर्ती (तीन विकेट) आणि बिश्नोई (तीन विकेट) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ 17.5 षटकांत 141 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे भारताने टी-20 क्रिकेटमध्ये सलग 11वा विजय नोंदवला. 107 धावांच्या तुफानी खेळीसाठी संजू सॅमसनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. संजूने 50 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 107 धावा केल्या आणि विक्रमांची मालिका रचली. यादरम्यान, भारतीय कोच गौतम गंभीरचं जुने ट्वीट व्हायरल होते आहे, ज्यामध्ये त्याने, संजू सॅमसन हा केवळ भारतातील सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाज नाही तर भारतातील सर्वोत्तम युवा फलंदाज आहे, असे म्हटले होते. हे जुने ट्वीट  2020 मधील आहे, जेव्हा संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते.

संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात केले हे मोठे पराक्रम -

  • सलग दोन टी-20I सामन्यात शतके ठोकणारा संजू सॅमसन हा चौथा फलंदाज ठरला. याआधी हा मोठा पराक्रम फक्त फ्रान्सचा गुस्ताव मॅककीन, दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो रोसो आणि इंग्लंडचा फिल सॉल्ट यांनी केला होता.
  • संजू सॅमसन हा यष्टीरक्षक म्हणून दोन किंवा त्याहून अधिक टी-20 शतके करणारा जगातील दुसरा फलंदाज आहे. भारतीय विकेटकिपर म्हणून कधी महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत यांनी पण हे विक्रम करता आले नाही. यापूर्वी हा विक्रम फक्त सर्बियाच्या लेस्ली एड्रियन डनबरच्या नावावर होता.
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20I सामन्यात सर्वाधिक धावा करणारा संजू सॅमसन हा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, ज्याने 2015 मध्ये धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर 106 धावांची इनिंग खेळली होती.
  • संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर टी-20I सामन्यांमध्ये भारतीयाकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर होता, ज्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर 100 धावांची इनिंग खेळली होती.
  • संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20I मध्ये चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली. या प्रकरणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बाबर आझम (122) च्या नावावर आहे. त्यानंतर जॉन्सन चार्ल्स (118) आणि ख्रिस गेल (117) यांचा क्रमांक लागतो.
  • संजू सॅमसन रॉबिन उथप्पासह टी-20I मध्ये 7000 धावा करणारा संयुक्त सातवा वेगवान भारतीय ठरला. त्याने आपल्या 269व्या डावात ही कामगिरी केली.
  • संजू सॅमसन हा सलग दोन T20I डावात भारतासाठी सर्वाधिक 218 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ऋतुराज गायकवाडचा विक्रम मोडला. सलग 2 डावात 181 धावा करण्याचा विक्रम गायकवाडच्या नावावर होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझाHingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget