संजूने हवेत झेपवत घेतला जबराट झेल, सोशल मीडियावर होतोय कौतुक
Sanju Samson Catch : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये चौथा टी20 सामना सुरु आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Sanju Samson Catch : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये चौथा टी20 सामना सुरु आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फ्लोरिडा येथे भारताच्या गोलंदाजांनी दमदार सुरुवात केली. अर्शदीपने सलामीच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. कॅरेबिअन फलंदाज कायल मायर्स याचा संजू सॅमसन याने जबरदस्त झेल घेतला. संजूने घेतलेल्या झेलचे सोशल मीडियावर कौतुक होतेय.
अर्शदीप सिंह दुसरे षटक टाकत होता. पहिला चेंडू निर्धाव टाकला पण दुसऱ्या चेंडूवर कायल मायर्स याने खणखणीत चौकार लगावला. पण तिसऱ्या चेंडूवर अर्शदीप याने पुनरागमन केले. अर्शदीपच्या चेंडूवर चौकार मारण्याचा मायर्सने प्रयत्न केला पण चेंडू संजूच्या हातात विसावला. संजूने हवेत झेपवत जबराट झेल घेतला. कायल मायर्स याने सात चेंडूवर 17 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत दोन चौकार मारले. त्याशिवाय एक गगनचुंबी षटकारही ठोकला.
Some brilliant catches from Sanju Samson and Kuldeep Yadav.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 12, 2023
Arshdeep gave team India the opening they wanted! pic.twitter.com/rB4OWIgWm4
#SanjuSamson pic.twitter.com/8j1bFV9YI8
— rajsthan_royal_offical (@Technic08559461) August 12, 2023
#SanjuSamson You Beauty, What a catch by Sanju
— Cricofy (@Cricofy) August 12, 2023
#WIvIND #WIvsIND #WorldCup2023 #INDvsWI #INDvWI pic.twitter.com/nGNbryzIO8
Woah 😯#SanjuSamson #INDvsWI pic.twitter.com/JmHzkDwkz1
— MOHAMMAD (@Mohammedptl_18) August 12, 2023
Amazing catchs by Sanju and Kuldeep
— Cricofy (@Cricofy) August 12, 2023
Fantastic bowling by Arshdeep#INDvsWI #INDvWI #WIvIND #WIvsIND #SanjuSamson #kuldeepyadav #arshdeepsingh #IndianCricket #IndianCricketTeam pic.twitter.com/maJsBdLShL
West Indies have won the toss and they've decided to bat first. #SanjuSamson #INDvsWI #T20I #cricketnews pic.twitter.com/1PQpXLz46Z
— Rajnish Kumar Yadav (@KrajnishYadav) August 12, 2023
भारताची प्लेईंग 11 -
यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, सुर्यकुमार यादव (उपकर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार
ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमैन पॉवेल (कर्णधार), शिम्रोन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकील होसेन, ओबेद मैककॉय
युवा ब्रिगेड कमाल करणार का ?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा टी 20 सामना रंगणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिले दोन सामने वेस्ट इंडिजने जिंकले होते. तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने कमबॅक केले. आज चौथा टी20 सामना फ्लोरिडा येथे रंगणार आहे. हा सामना जिंकून विडिंज मालिका खिशात घालणार की भारत जिंकून बरोबरी साधणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. मागील सात वर्षांत वेस्ट इंडिजला भारताविरोधात टी20 मालिका जिंकता आली नाही. कॅरेबिअन आर्मीने 2016 मध्ये अखेरची टी20 मालिका जिंकली होती.
पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप गेलेल्या सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या सामन्यात विडिंजची गोलंदाजी फोडून काढली. तिलक वर्मा याने सूर्यकुमार याला चांगली साथ दिली. तिलक वर्माने तिन्ही सामन्यात दर्जेदार फलंदाजी केली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. सलामी फलंदाज शुभमन गिल तिन्ही सामन्यात फेल गेला. पदार्पण करणारा यशस्वी जयस्वाल यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. कर्णधार हार्दिक पांड्यालाही अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीत कुलदीप आणि चहल यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. हार्दिकनेही अचूक टप्प्यावर मारा केलाय. आज होणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय ? याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागलेय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
