Sahibzada Farhan & Sanjay Raut: साहिबझादा फरहानने मैदानात एके-47 चालवल्यावर सूर्यकुमार यादवने तिकडेच कंबरड्यात लाथ घालायला पाहिजे होती; संजय राऊत संतापले
Ind vs Pak match Sahibzada Farhan: साहिबझादा फरहानने आक्रमक खेळी करत अर्धशतक झळकावले होते. यानंतर त्याने बॅट बंदुकीसारखी उंचावली होती. यावरुन वाद निर्माण झाला आहे.

Ind vs Pak match Sahibzada Farhan gun firing celebration: आशिया चषक स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने नेहमीप्रमाणे पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) यांच्यात प्रचंड तणाव आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा फलंदाज साहिबझादा फरहान याने काल अर्धशतक झळकावल्यानंतर केलेले सेलिब्रेशन टीकेचा विषय ठरत आहे. अर्धशतक झाल्यावर साहिबझादा फरहान (Sahibzada Farhan) याने त्याची बॅट हवेत रायफलसारखी धरुन गोळ्या झाडल्याची अॅक्शन केली. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे अंधभक्त भारतीय खेळाडूंनी कशाप्रकारे पाकिस्तानशी शेकहँड केला नाही, हे कौतुकाने सांगत आहेत. मात्र, काल साहिबझादा फरहान याने मैदानात जो प्रकार केला त्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने त्याच्या कंबरड्यात लाथ मारायला हवी होती, असे संतप्त उद्गार संजय राऊत यांनी काढले. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
काल भारत-पाक सामना खेळला गेला. साहिबझादा फरहान या खेळाडूने त्याचं अर्धशतक झाल्यावर मैदानातच एके-47 हातात धडाधड गोळ्या झाडतात तशी अॅक्शन केली. त्याने दाखवलं की, आमच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये तुमच्या 26 नागरिकांना अशाप्रकारे गोळ्या घालून ठार मारले. त्याने भारताला डिवचलं, शहीदांचा अपमान केला. मात्र, भाजपच्या अंधभक्तांना भारत आणि पाकच्या खेळाडुंची शाब्दिक चकमक आणि सूर्यकुमार यादवने कशाप्रकारे शेकहँड केला नाही, याचेच कौतुक आहे. हे इतरांनी केले असते तर भाजपने रस्त्यावर उतरुन थयथयाट केला असता. पण आता भाजपचे नेतेही पाकिस्तानविरुद्ध बोलायला घाबरत आहेत, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली.
Sanjay Raut & Jay Shah: संजय राऊतांची अमित शाह आणि जय शाह यांच्यावर टीका
काल पंतप्रधान मोदी यांनी पाच वाजता देशाला संबोधित केले. एरवी मोदींची धक्का द्यायची वेळ रात्री आठ वाजताची आहे. मात्र, भाजपच्या अंधभक्तांना भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना पाहता यावा, त्यासाठी मोदी काल पाच वाजता बोलले. जय शहा काल बीसीसीआयच्या निवडणुकीमुळे मुंबईत होते. काल पाकिस्तानी खेळाडू मैदानात बंदुकीसारखी बॅट उंचावून दाखवत होता. अमित शाह आणि जय शाह यांच्यामुळे हे सगळं देशाला भोगावं लागत आहे. या कार्यासाठी जय शाह यांना भारतरत्न दिला पाहिजे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 निरपराध लोकांची हत्या केली. भारतीय महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले. मग तरीही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचे प्रयोजन काय? कोण हा जुगार खेळतंय? भारत पाकिस्तान सामन्यावर दीड लाख कोटी रुपयांचा सट्टा खेळण्यात आला, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
आणखी वाचा
पहिले साहिबजादाकडून गोळीबाराची ॲक्शन; आता हारिस रौफनेही डिवचलं, नको नको ते मैदानात केलं, VIDEO




















