Ind vs Pak Final 2025 : नको ते कृत्य करून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी घेतलं धोनी अन् कोहलीचं नाव, ICCच्या सुनावणीत नेमकं घडलं काय?
India vs Pakistan Final Asia Cup 2025 Update : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशिया कप 2025 मध्ये दोन वेळा पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली.

India vs Pakistan Final Asia Cup 2025 Update : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशिया कप 2025 मध्ये दोन वेळा पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. 14 सप्टेंबरला ग्रुप स्टेजमध्ये आणि त्यानंतर 21 सप्टेंबरला सुपर-फोर सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली. या स्पर्धेत जेव्हा-जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले, तेव्हा-तेव्हा वाद झाला. सुपर-फोरच्या लढतीत तर पाकिस्तानच्या खेळाडूंनी सीमाच ओलांडली. पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतक ठोकल्यानंतर केलेल्या भडकावू सेलिब्रेशनमुळे बीसीसीआयला थेट आयसीसीकडे तक्रार दाखल करावी लागली. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी झाली.
सुनावणीत शिक्षा टाळण्यासाठी साहिबजादा फरहानने वेगवेगळे कारणं सागितले. भारतविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने गन सेलिब्रेशन केले होते. त्याने बॅट बंदुकीसारखी धरून फायरिंगसारखी अॅक्शन केली. या सेलिब्रेशनला ऑपरेशन सिंदूरशी जोडून पाहिले जात आहे. आयसीसी एलिट पॅनेलचे रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत फरहानने युक्तिवाद केला की त्याचा सेलिब्रेशन राजकीय नव्हता.
शिक्षा टाळण्यासाठी फरहानने घेतलं धोनी अन् कोहलीचं नाव
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षा टाळण्यासाठी फरहानने एम. एस. धोनी आणि विराट कोहली यांची नावेही घेतली. त्याने सांगितले की, दोघांनीही पूर्वी अशाच पद्धतीने बंदुकीसारख सेलिब्रेशन केलं होतं. एवढेच नाही तर त्याने लग्नसोहळ्याचं पण एक कारण सांगितले. फरहान म्हणाला की, मी पठाण आहे आणि आमच्या भागात असे हावभाव संस्कृतीचा भाग आहेत आणि लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी ते सामान्यतः पाहिले जातात. त्यामुळे त्याचा सेलिब्रेशन राजकीय हेतूने नव्हता.
आयसीसीच्या सुनावणीत हरिस रौफ काय म्हणाला?
भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान हरिस रौफच्या हावभावांवर बरीच टीका झाली. या वर्षाच्या सुरुवातीला पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात हे विशेषतः संवेदनशील मानले जात होते. दरम्यान, बीसीसीआयने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ याचीही तक्रार दाखल केली होती. फरहानची सुनावणी संपल्यानंतर हरिस रौफची सुनावणी झाली. रौफ सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंशी वाद घालताना दिसला होता. याशिवाय त्याने 6-0चा इशारा केला आणि लढाऊ विमान पाडल्याचा इशाराही दिला होता.
सुनावणीत रौफ काय म्हणाला की, त्याचा "6-0" हावभाव भारताशी संबंधित नव्हता. सुनावणीदरम्यान, त्याने प्रश्न विचारला, "6-0 चा अर्थ काय?" हे भारताशी कसे जोडले जाऊ शकते?' आयसीसी अधिकाऱ्यांनीही कबूल केले की ते '6-0' हावभाव स्पष्ट करू शकत नाहीत. यावर रौफने उत्तर दिले, "बस्स, त्याचा भारताशी काहीही संबंध नाही."
आयसीसीने तरी करणार कारवाई?
दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, फरहान आणि हरिस या दोन्ही पाकिस्तानी खेळाडूंना आयसीसीकडून दंड होऊ शकतो. दंड त्यांच्या सामन्याच्या फीच्या 50% ते 100% पर्यंत असू शकतो. पण, निलंबन किंवा बंदी घालण्याची शक्यता कमी आहे. गुरुवारी, पाकिस्तानने दुबईमध्ये बांगलादेशचा 11 धावांनी पराभव करून आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताविरुद्ध सलग पराभवानंतर, सलमान आगाचा संघ 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया कपचे विजेतेपद जिंकण्याचे लक्ष्य ठेवून 28 सप्टेंबर रोजी भारताचा सामना करेल.
हे ही वाचा -





















