एक्स्प्लोर

क्रिकेटचा देव गोलंदाजीतही बाप! बुमराह-भुवनेश्वर पेक्षा सचिन तेंडुलकरच्या जास्त विकेट, जाणून घ्या आकडेवारी

Sachin Tendulkar ODI Wickets : 'क्रिकेटचा देव' म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन तेंडुलकर अनेकदा त्याच्या धावांमुळे चर्चेत असतो. 

Sachin Tendulkar ODI Wickets : 'क्रिकेटचा देव' म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन तेंडुलकर अनेकदा त्याच्या धावांमुळे चर्चेत असतो. तसेच, त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 शतके लक्षात ठेवली जातात. सचिनला निवृत्त होऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला, पण आजही त्याचे अनेक विक्रम मोडलेले नाहीत. सचिन केवळ बॅटनेच नाही तर गोलंदाजीतही चमत्कार केला आहे. याचा पुरावा म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्यासारख्या गोलंदाजांपेक्षा त्याच्या नावावर जास्त विकेट आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने या फॉरमॅटमध्ये 334 विकेट घेतल्या आहेत. त्याच्याशिवाय फक्त जवागल श्रीनाथला वनडेत 300 विकेटचा टप्पा पार करता आला आहे. सचिन तेंडुलकरबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या नावावर 154 विकेट्स आहेत. मात्र जसप्रीत बुमराह लवकरच सचिनला मागे टाकू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बुमराहच्या नावावर 149 विकेट आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून भुवनेश्वर कुमारने 141, इशांत शर्माने 115, युजवेंद्र चहलने 121, मुनाफ पटेलने 86, आरपी सिंगने 69 आणि रवी शास्त्रीने 129 विकेट घेतल्या आहेत. या सर्व दिग्गजांपेक्षा सचिन तेंडुलकर पुढे आहे. सचिनची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 32 धावांत 5 विकेट आहे.

सचिन तेंडुलकरचे हे 3 विक्रम मोडणे कठीण 

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. तेंडुलकरने 264 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला, ज्यात 100 शतके आणि 164 अर्धशतकांचा समावेश आहे.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34,357 धावा केल्या आहेत. तो क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सचिनचा हा विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 664 सामने खेळले. सध्या 500 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा पार करणारा विराट कोहली एकमेव फलंदाज आहे.

हे ही वाचा -

Ind vs Ban 1st Test Playing 11 : जागा 1, दावेदार 3; टीम इंडियाच्या प्लेइंग-11मध्ये कर्णधार रोहित शर्मा कुणाला देणार संधी?

IPL 2025 Mega Auction : RCB मेगा लिलावात 'या' खेळाडूंवर खेळणार डाव.... विराट कोहली पहिल्यांदा जिंकणार IPL ट्रॉफी?

Ishan Kishan : 14 चौकार, 3 षटकार अन् खणखणीत शतक, इशान किशनने टीकाकारांना दोन शब्दांत दिले चोख प्रत्युत्तर, पोस्ट व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Embed widget