एक्स्प्लोर

Sachin Tendulkar Birthday : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे 'हे' पाच विक्रम मोडणं अतिशय कठीण, याच्याजवळ एकही फलंदाज नाही

Sachin Tendulkar Records : मास्टर ब्लास्टर सनिच तेंडुलकरच्या नावावर असणारे पाच विक्रम जाणून घ्या. हे विक्रम मोडणं अतिशय कठीण आहे.

Sachin Tendulkar Records in Cricket : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज 50 वा वाढदिवस आहे. क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर, लिटल मास्टर अशी अनेक नावे चाहत्यांनी त्याला दिली आहेत. सचिन भारतीय क्रिकेटमध्येच नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलं आहे, असं म्हटलं तीर वावगं ठरणार नाही. प्रदीर्घ कारकिर्दीत माजी भारतीय फलंदाजा सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम रचले आहेत. हे विक्रम आजतायगत कुणाला मोडता आलेले नाहीत. मास्टर ब्लास्टर सनिच तेंडुलकरच्या नावावर असणारे पाच विक्रम जाणून घ्या. हे विक्रम मोडणं अतिशय कठीण आहे.

1. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 200 कसोटी आणि 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये 200 सामने खेळणारा सचिन हा जगातील एकमेव फलंदाज आहे. हा एक विश्वविक्रम आहे. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 329 डावांमध्ये 53.78 च्या सरासरीने 15,921 धावा केल्या. तसेच, वनडे क्रिकेटमध्ये सचिनच्या बॅटने 18,426 धावा ठोकल्या आहेत. कसोटी आणि वनडेमध्ये सचिनच्या या विक्रमाच्या आसपासही एकही फलंदाज नाही.

2. शतकांचं शतक

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रील क्रिकेटमध्ये 100 शतकं ठोकली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं झळकावणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे. सध्याच्या घडीला जगातील कोणत्याही फलंदाजासाठी सचिनचा हा विक्रम मोडणं सोपं नाही. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 51 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके झळकावली आहेत.

3. सर्वाधिक विश्वचषक सामने खेळण्याचा विक्रम

सर्वाधिक विश्वचषक खेळण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण सहा विश्वचषक खेळले आणि गेल्या विश्वचषकातही तो टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात यशस्वी ठरला होता. सचिनने 1992 मध्ये पहिला विश्वचषक खेळला होता. यानंतर, तो 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 विश्वचषक संघाचा भाग होता.

4. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार

सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या कारकिर्दीत एकूण 200 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 51 शतके आणि 68 अर्धशतकं झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने पांढऱ्या जर्सीमध्ये खेळताना 2,127 वेळा चेंडू बाऊंड्री लाईन पलिकडे नेला आहे. यामध्ये 2058 चौकार आणि 69 षटकारांचा समावेश आहे.

5. सर्वाधिक एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळण्याचा विक्रम

सचिन तेंडुलकरने त्याच्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत 200 कसोटी सामने आणि 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या दोन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा सचिन जगातील एकमेव फलंदाज आहे. टी20 क्रिकेट सध्याची वाढती लोकप्रियता पाहता, सचिनच्या या विक्रमाची बरोबरी करणं कोणत्याही खेळाडूसाठी सध्या अवघड दिसत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sachin Tendulkar 50th Birthday : सचिन तेंडुलकरनं पूर्ण केलं आयुष्याचं 'अर्धशतक', साडे पाच फुट उंच मुलगा कसा ठरला 'क्रिकेटचा देव'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे, रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे, रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवादRavindra Dhangekar Family : आज मतदान, काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांची घरी देवपूजाChhatrapati Sambhajinagar Racket : 19 वर्षाच्या विद्यार्थीनीकडून गर्भनिदान रॅकेट, इंजिनिअरच्या तरुणीचा कारनामाUddhav Thackeray Mumbai Sabha : मोदींना आमची मुलं कडेवर घेऊन जावं लागतात, ठाकरेंनी धू धू धुतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे, रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे, रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Sushma Andhare: राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही; त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलेय; सुषमा अंधारेंचा पलटवार
राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही; त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलेय; सुषमा अंधारेंचा पलटवार
Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Embed widget