Sa vs Ind 3rd T20 : पुन्हा दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली! सेंच्युरियन टी-20मध्ये टीम इंडियाचा मोठा निर्णय, 'या' खेळाडूचे पदार्पण
South Africa vs India 3rd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे.
South Africa vs India 3rd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. गोलंदाज आवेश खानच्या जागी रमणदीप सिंगचा समावेश करण्यात आला आहे. या सामन्यातून रमणदीप टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहे.
🚨 Toss Update 🚨
— BCCI (@BCCI) November 13, 2024
South Africa win the toss and elect to field in the 3rd T20I.
Live - https://t.co/JBwOUChxmG#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/wpBD80HHRg
भारतीय संघाने मालिकेतील पहिला टी-20 सामना 61 धावांनी जिंकला होता. पण दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 3 विकेट्सने विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अष्टपैलू रमणदीप सिंगला डेब्यू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू नुकताच उदयोन्मुख आशिया कप स्पर्धेत खेळला होता जिथे त्याची फलंदाजी अप्रतिम होती. रमणदीप आयपीएलमध्ये केकेआर आणि रणजीमध्ये पंजाबकडून खेळतो.
Say hello 👋 to the Debutant 😎
— BCCI (@BCCI) November 13, 2024
A special moment for Ramandeep Singh as he receives his #TeamIndia Cap 🧢 from @hardikpandya7 👏👏
Live - https://t.co/JBwOUChxmG#SAvIND pic.twitter.com/3TLzxQ16xu
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
3rd T20I. India XI: S. Samson (wk), A. Sharma, S. Yadav (c), T. Varma, H. Pandya, R. Singh, A. Patel, A. Singh, R. Bishnoi, R.Singh, V. Chakravarthy. https://t.co/id6j7RV9wp #SAvIND
— BCCI (@BCCI) November 13, 2024
दक्षिण आफ्रिका : रायन रिक्लेटन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (क), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्के जेन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुथो सिपामला.
3rd T20I. South Africa XI: R. Hendricks, R. Rickelton, A. Markram (c), T. Stubbs, H. Klaasen (wk), D. Miller, M. Jansen, A. Simelane, G. Coetzee, K. Maharaj, L. Sipamla. https://t.co/id6j7RV9wp #SAvIND
— BCCI (@BCCI) November 13, 2024
हे ही वाचा -