Sanju Samson च्या बदल्यात राजस्थानचा चेन्नईच्या तीन नावांवर विचार? कोणता एक खेळाडू संघात येणार? सर्वच हैराण
RR And CSK Trade Deal For Sanju Samson: आयपीएल 2026 पूर्वी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात संजू सॅमसन संदर्भात ट्रेड डील होऊ शकते. याबदल्यात राजस्थाननं चेन्नईच्या खेळाडूंची यादी तयार केली आहे.

Rajasthan Royals Trade Deal For Sanju Samson: राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन आयपीएलच्या 2026 पूर्वी टीम सोडण्याच्या तयारीत आहे. मिडिया रिपोर्टसनुसार सॅमसननं राजस्थान रॉयल्सला रिलीज करण्याची विनंती केली आहे. राजस्थान रॉयल्सनं देखील याचा फायदा करुन घ्यायचं ठरवलं आहे. राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्ज सोबत ट्रेड डील करण्याची तयारी दर्शवली आहे. रिपोर्टनुसार राजस्थानच्या टीमनं सॅसमनच्या बदल्यात चेन्नईच्या तीन खेळाडूंची यादी तयार केली असून त्यापैकी एकाला संघात घ्यायचं आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या 3 खेळाडूंवर राजस्थानची नजर
राजस्थान रॉयल्सला संजू सॅमसनला संघातून बाहेर जायला सांगत नाही. मात्र, सॅमसनला स्वत: टीमच्या बाहेर जायचं आहे. मात्र, राजस्थान रॉयल्स सॅमसनच्या बदल्यात आक्रमक खेळाडूला संघात सामील करुन घेण्याचा प्रयत्न करतेय. राजस्थाननं चेन्नईच्या रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे या तिघांची नावं दिली आहेत. राजस्थान रॉयल्स तीन पैकी एक खेळाडू मिळाल्यास संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नईसोबत ट्रेड डील करण्याच्या तयारीत आहे.
आयपीएलमधील ट्रेड डील म्हणजे काय?
आयपीएलच्या 2025 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सनं संजू सॅसमनला 18 कोटी रिटेन केलं होतं. चेन्नई सुपर किंग्जनं रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाडला 18-18 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. तर, चेन्नईनं शिवम दुबेला 12 कोटी रुपयेला घेतलं होतं. आयपीएल 2026 साठी राजस्थान आणि चेन्नई यांच्यात ट्रेड डील झाल्यास संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांच्यातील खेळाडू राजस्थानकडे गेल्यास आर्थिक देवाण घेवाण होणार नाही.
चेन्नई सुपर किंग्ज शिवम दुबेला राजस्थानसाठी सोडण्यास तयार झाल्यास सीएसकेला राजस्थान रॉयल्सला 6 कोटी रुपये द्यावे लागतील. सॅमसनची रिटेन प्राईस शिवम दुबेच्या तुलनेत 6 कोटी रुपये अधिक आहे. यालाच आयपीएलमधील ट्रेड डील म्हटलं जातं. आयपीएल फायनल झाल्यानंतर आणि पुढील हंगाम सुरु होण्यापूर्वी 30 दिवस अगोदर ट्रेड डील करावी लागते.




















