एक्स्प्लोर

Asia Cup 2025 Pakistan Squad: बाबर आझम-मोहम्मद रिझवान बाहेर; सलमान आगाकडे धुरा, आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संभाव्य संघ

Asia Cup 2025 Pakistan Squad: आशिया चषक 2025 ची स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान टी-20 स्वरूपात खेळवण्यात येणार आहे.

Asia Cup 2025 Pakistan Squad: आशिया चषक 2025 ची स्पर्धा (Asia Cup 2025 Pakistan Squad) 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान टी-20 स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. आशिया चषकाची स्पर्धा सुरु होण्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. क्रिकेट आशिया कपसाठी पाकिस्तानच्या संघात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानचे पुनरागमन खूप कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान आगाच्या नेतृत्वाखाली वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संभाव्य संघ कसा असेल?, जाणून घ्या...

गेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तानचे कर्णधारपद बाबर आझमकडे होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बाबर आझम चांगल्या फॉर्मात नाहीय. यावर्षी बाबरने कोणताही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत बाबर आझमला आशिय कपसाठी पाकिस्तानच्या संघात संधी मिळणं खूप कठीण आहे. बाबर आझम टी-20 मध्ये गेल्या 11 डावांमध्ये एकही अर्धशतक करू शकला नाही.

बाबर आझमची टी-20 क्रिकेटमधील कारकीर्द-

सामने: 128
डाव: 121
धावा: 4223
सर्वोच्च धावसंख्या: 122
स्ट्राइक रेट: 129.22
शतके: 3
अर्धशतके: 36

बाबर आझमप्रमाणेच पाकिस्तानचा माजी टी-20 कर्णधार मोहम्मद रिझवाननेही यावर्षी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. मोहम्मद रिझवानलाही टी-20 च्या संघात स्थान देण्यात आलेले नाहीय. त्यामुळे आशिया चषकच्या संघातही मोहम्मद रिझवानला संधी मिळणार नाही. दरम्यान, आशिया कपमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा समावेश ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुप ए मध्ये टीम इंडिया, ओमान आणि यूएई आहे. सर्व संघ ग्रुपमधील इतर संघांसोबत 1-1 सामने खेळतील. या ग्रुपमधील टॉप 2 संघ सुपर 4 मध्ये जातील. 

मोहम्मद रिझवानची टी-20 क्रिकेटमधील कारकीर्द-

सामने: 106
डाव: 93
धावा: 3414
सर्वोच्च धावसंख्या: 104*
स्ट्राइक रेट: 125.37
शतके: 1
अर्धशतके: 30

शाहीन अफ्रिदीला स्थान, फखर जमानबाबत सस्पेन्स-

पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला आशिया कप संघात स्थान मिळू शकते. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये फखर जमानला दुखापत झाली होती, त्याच्या खेळण्यावर सस्पेन्स कायम आहे.

आशिया कप 2025 साठी पाकिस्तानचा संभाव्य संघ- (Asia Cup 2025 Pakistan Squad)

सलमान आगा (कर्णधार), फखर जमान, सैम अयुब, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), हसन नवाज, साहिबजादा फरहान, फहीम अश्रफ, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, अबरार अहमद, हारिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम.

आशिया कपमध्ये पाकिस्तानचे वेळापत्रक-

12 सप्टेंबर - वि ओमान (दुबई)

14 सप्टेंबर - भारत विरुद्ध (दुबई)

17 सप्टेंबर - वि UAE (दुबई)

आशिया कप 2025 साठी भारताचा संभाव्य संघ -

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा / प्रसिद्ध कृष्णा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा / ध्रुव जुरेल.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Team India Schedule: इंग्लंडविरुद्धचा दौरा संपला, आता टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
Rohit Sharma Retirement: गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर
रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Embed widget