एक्स्प्लोर

PBKS vs RCB IPL 2026 : प्लेऑफचं पहिली तिकीट बंगळुरूला! तर पंजाबच्या आशांवर बुलडोझर, पराभवाच्या षटकारानं श्रेयसच्या टीमचं टॉप-4चं समीकरण बिघडलं

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 61व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा 23 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला.

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 61व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा 23 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला. या हंगामातील RCBचा हा नववा विजय ठरला. पंजाबविरुद्धच्या या दमदार विजयासह बंगळुरूने अधिकृतपणे प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून, आयपीएल 2026 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरणारी ती पहिली टीम बनली आहे. दुसरीकडे पंजाब किंग्सला यंदाच्या मोसमातील सहाव्या पराभवाला सामोरं जावं लागलं असून, आता त्यांचं प्लेऑफमध्ये पोहोचणं अत्यंत कठीण झालं आहे. पंजाबच्या या पराभवामुळे प्लेऑफची शर्यत आणखी रंगतदार झाली आहे. या निकालाचा फायदा चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघांना मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

व्यंकटेश अय्यर अन् विराटची वादळी खेळी

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जेकब बेथेल 11 धावा करून बाद झाला. परंतु, त्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. विराटने 37 चेंडूंत 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, ज्यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. पडिक्कलने 25 चेंडूंत 45 धावांचे योगदान दिले.

या दोघांनंतर मैदानात आलेल्या व्यंकटेश अय्यरने पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. व्यंकटेशने अवघ्या 40 चेंडूंत नाबाद 73 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 4 षटकार ठोकले. डावाच्या अखेरीस टिम डेव्हिडने 12 चेंडूंत 28 धावा केल्या. आरसीबीने 20 षटकांत 4 बाद 222 धावांचा धावसंख्या उभारली. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने 35 धावांत 2 विकेट्स घेतले, तर अर्शदीप आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी 1 बळी मिळाला.

पंजाब किंग्जची झुंज अपयशी; शशांक सिंगची अर्धशतकी खेळी

223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर प्रियांश आर्या (0) आणि प्रभसिमरन सिंग (2) स्वस्तात बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यरही 1 धावेवर बाद झाल्याने पंजाबची स्थिती 3 बाद 19 अशी बिकट झाली होती.

यानंतर कूपर कॉनोली (37) आणि सूर्यांश शेंडगे (35) यांनी काही काळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मधल्या फळीत मार्कस स्टॉइनिस (37) आणि शशांक सिंग यांनी पंजाबच्या आशा जिवंत ठेवल्या. विशेषतः शशांक सिंगने आरसीबीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने अवघ्या 27 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 56 धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र, रसिक सलाम दारने त्याला बाद करत पंजाबच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. पंजाबचा संघ 20 षटकांत 8 बाद 199 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

हे ही वाचा -

Ind vs Afg Test : साईचा पत्ता कट, सरफराजला मिळणार सुवर्णसंधी? अफगाणिस्तानविरुद्ध असा असणार 15 खेळाडूंचा टीम इंडियाचा Squad

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget