(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma Ind vs Ban : "विचार करण्याची गरज नाही...", कर्णधार रोहितने बांगलादेशविरुद्ध सामन्यापूर्वी भारतीय Playing 11बद्दल केलं मोठं वक्तव्य
Rohit Sharma press conference Update : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नई येथे 19 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
Rohit Sharma on India Playing 11 Ind vs Ban 1st Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नई येथे 19 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील चेन्नईत पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत घेतली. ज्यामध्ये त्याने कसोटी सामन्यांच्या तयारीवर आपले मत मांडले आणि प्लेइंग इलेव्हनबद्दलही बोलला. भारतीय संघाचे खेळाडू एका महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहेत. भारतीय संघाने शेवटची वेळ जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळली होती.
रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनबाबत केले मोठे वक्तव्य
मीडियाशी संवाद साधताना रोहितने प्लेइंग इलेव्हनच्या निवडीबाबत आपले मत मांडले आणि म्हणाला, "प्लेइंग इलेव्हनच्या निवडीबाबत काही गोष्टी सोप्या आहेत, ज्यावर आम्ही लक्ष केंद्रित करतो. जास्त विचार करण्याची गरज नाही. जेव्हा आम्ही संघात अकरा निवडतो, तेव्हा आम्ही पाहतो की खेळाडूंनी आधी कशी कामगिरी केली आहे.
कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला की, जेव्हा आम्ही शेवटची मालिका खेळलो तेव्हा बरेच खेळाडू अनुपलब्ध होते, आणि काही खेळाडू अजूनही दुखापतग्रस्त आहेत. परंतु त्यापैकी अधिकाधिक खेळाडू आता आमच्यासोबत आहेत. आता ही कसोटी जिंकण्यासाठी आम्ही सर्वोत्तम अकराची निवड करावी लागेल.
दोन्ही संघ -
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
बांगलादेश संघ : नजमुल हसन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, झाकेर अली, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, महमदुल हसन जॉय, नईम हसन आणि खालेद अहमद.
हे ही वाचा -
मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठी घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा होणार कर्णधार?
युरोपीयन तरुणींची नीरज चोप्रासोबत फोटो काढण्यासाठी धडपड; सेल्फीनंतर नंबरही मागितला, Video
महिनाभर MS धोनीनं सोडलं होतं चिकन, मटण...; कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य