एक्स्प्लोर

Ind vs Aus 4th Test : टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये पुन्हा होणार उलथापालथ! मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी रोहित शर्माची 'शतरंज की चाल'

India vs Australia 4th Test : 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

Rohit Sharma open for India in the Boxing Day Test : मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने आपली प्लेइंग इलेव्हन आधीच जाहीर केली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाकडून सामन्यामध्ये खेळणाऱ्या 11 खेळाडूंची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. डब्ल्यूटीसी फायनलच्या दृष्टिकोनातून हा सामना भारताला कोणत्याही किंमतीत जिंकणे आवश्यक आहे आणि त्यासाठी भारतीय कर्णधाराने नवीन रणनीती आखली आहे. रोहित शर्मा चौथ्या कसोटीसाठी संघात अनेक मोठे बदल करू शकतो. 

रोहित शर्मा पुन्हा करणार ओपन

बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळला नव्हता. त्यावेळी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने अप्रतिम फलंदाजी केली. त्यामुळे संघात पुनरागमन करताना त्याने ओपनिंगमध्ये कोणताही बदल केला नाही. तो स्वतः सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला. मात्र गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत खराब राहिली. त्याला 3 डावात 6.33 च्या सरासरीने केवळ 19 धावा करता आल्या आहेत. आता मेलबर्नमधील खेळपट्टी फलंदाजीसाठी थोडी सोपी असू शकते. अशा परिस्थितीत रोहितने पुन्हा ओपन करण्याचा निर्णय घेतला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तो यशस्वी जैस्वालसोबत डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. चेंडू जुना झाल्यानंतर खेळपट्टीवर धावा काढणे सोपे होईल. सुरुवातीला काही काळ टिकून राहिल्यास तो फॉर्ममध्ये परत येऊ शकतो. रोहितच्या जागी ओपनिंग करणाऱ्या राहुलला शुभमन गिलऐवजी तिसऱ्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकते. मात्र, सलामी करताना राहुलने आतापर्यंतच्या मालिकेत चांगली फलंदाजी केली आहे. त्याने 47 च्या सरासरीने 235 धावा केल्या आहेत, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा 'फ्लॉप शो'

रोहित शर्माने 2024 मध्ये आतापर्यंत 13 कसोटी खेळल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 26.39 च्या सरासरीने 607 धावा केल्या आहेत. तर मागील 13 डावांमध्ये रोहितने 12 पेक्षा कमी सरासरीने 152 धावा केल्या आहेत. आता बॉक्सिंग डे कसोटीत रोहित शर्मा कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टीम इंडिया दोन स्पिनर्ससह उतरणार मैदानात 

मेलबर्नच्या मैदानावर फिरकीपटूंना खूप मदत मिळते. चौथ्या आणि पाचव्या दिवशी त्यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. रिपोर्टनुसार, याचा विचार करता कर्णधार रोहित शर्मा दोन फिरकीपटूंना मैदानात उतरवू शकतो. रवींद्र जडेजासोबत वॉशिंग्टन सुंदरलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. सुंदरला खेळवण्यासाठी नितीश कुमार रेड्डीचा पत्ता कट होऊ शकतो.

हे ही वाचा -

Boxing Day Tests : क्रिकेटप्रेमींना बॉक्सिंग-डेला मिळणार तिहेरी डोस, 26 डिसेंबरला मैदानात उतरणार 6 संघ, भारत-पाकिस्तानमुळे उत्सुकता शिगेला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NDA Meeting Update : एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रतिनिधी जाण्याची शक्यता कमी, अजित पवार मुंबईत असल्याची सूत्रांची माहितीABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : लाडक्या बहिणींचे १५०० देण्यासाठी भाऊ आणि नवऱ्यांना सरकार दारुडे करणार, राऊतांची सडकून टीकाShrirang Barne Allegations : पिंपरी चिंचवडचे पोलीस हफ्तेवसुली करतात, श्रीरंग बारणेंचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत
आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी.. कष्टाचे पैसे द्या, योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची सरकारकडे मागणी
Embed widget