Rohit Sharma IND vs SA ODI : रोहित शर्मा पुन्हा होणार वनडे संघाचा कर्णधार?, गिल, अय्यर दुखापतीमुळे बाहेर, BCCI लवकरच करणार संघाची घोषणा
Team India Squad vs South Africa ODI Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची बीसीसीआय लवकरच घोषणा करणार आहे.

Team India Squad vs South Africa ODI Series : भारतीय संघाचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) सध्या मान दुखापतीने त्रस्त आहे. त्याच्या फिटनेसमुळे टीम इंडियाच्या प्लॅनवर पण मोठा परिणाम झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa Series) दुसऱ्या कसोटीत तो खेळण्याची शक्यता कमी मानली जात आहे. इतकेच नाही, तर 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठीही त्याची खेळण्यावर सस्पेन्स आहे. त्यातच उपकर्णधार श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer) बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे वनडे संघातून बाहेर आहे. दोन प्रमुख खेळाडू अनिश्चित असताना भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयसमोर (BCCI) नेतृत्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
रोहित शर्मा पुन्हा होणार वनडे संघाचा कर्णधार? (Rohit Sharma as India ODI Captain)
दरम्यान, सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे की, बीसीसीआय पुन्हा एकदा रोहित शर्माला वनडे संघाची कर्णधारपदाची जबाबदारी देण्याच्या विचारात आहे. इतकेच नाही, तर बोर्डाने रोहितशी या संदर्भात प्राथमिक चर्चा केली असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, तो पुन्हा वनडे कर्णधारपद स्वीकारेल का, हे स्पष्ट नाही. माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने तर स्पष्ट मत व्यक्त केले आहे की रोहित आता वनडे कर्णधारपद स्वीकारणार नाही.
केएल राहुल पण होऊ शकतो कर्णधार?
अशा परिस्थितीत केएल राहुल हा पर्याय म्हणून पुढे येतो. राहुलने यापूर्वीही शांत डोक्याने नेतृत्व केले असून संघातील वरिष्ठ खेळाडू त्याच्या नेतृत्व गुणांवर विश्वास ठेवतात. गिल आणि अय्यरच्या अनुपस्थितीत राहुलवर मोठी जबाबदारी येऊ शकते. दक्षिण आफ्रिका दौरा महत्त्वाचा असल्याने बीसीसीआय लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याची अपेक्षा आहे. आगामी काही दिवसांत टीम इंडियाच्या कर्णधारपदाबाबतची ही उत्सुकता शिगेला जाणार असून, भारतीय चाहत्यांचे लक्ष आता बीसीसीआयच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा संभाव्य संघ : (India probable ODI squad against South Africa)
शुभमन गिल (कर्णधार, दुखापत), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप सिंह, हरदीप यादव, मोहम्मद अरविंद यादव, मोहम्मद यादव, राजकुमार यादव. कृष्णा, मोहम्मद शमी, इशान किशन, ऋतुराज गायकवाड.
हे ही वाचा -




















