पुणे तिथं काय उणे! भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात पोस्टर झळकलं! चाहता म्हणाला, रोहित जोपर्यत..
Rohit Sharma : पुण्याच्या एमसीए मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना सुरु आहे.
World Cup 2023, IND vs BAN, Rohit Sharma : पुण्याच्या एमसीए मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या पारड्यात गेला. पुण्यातील टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांची रीघ लागली आहे. यामध्ये रोहित शर्माच्या एका चाहत्यांने लक्ष वेधलेय. रोहित शर्माच्या चाहत्याच्या हातात असणारे पोस्टर सध्या चर्चेचा विषय आहे.
रोहित शर्मा जोपर्यंत विश्वचषक उंचावत नाही, तोपर्यंत डेट करणार नाही, असे पोस्टरवर लिहिलेले आहे. रोहित शर्माच्या या चाहत्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्याशिवाय अन्य एका चाहत्याच्या पोस्टरवर क्रिकेट माझा धर्म आहे, रोहित शर्मा माझा देव... असे लिहिलेले आहे. या फोटोची जोरजार चर्चा सुरु आहे.
भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी पुण्याच्या मैदानावर चाहत्यांची रीग लागली आहे. हजारो चाहते स्टेडिअमवर आले आहेत. स्टेडिअम निळ्या रंगाने नाहून निघाल्याचे दिसत आहे. विश्वचषकात रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्मात आहे. तीन सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतक रोहितने ठोकले आहे. अफगाणिस्तानविरोधात रोहित शर्माने शतकी खेळी केली. तर पाकिस्तानविरोधात अर्धशतक ठोकले होते. आजही रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची चाहत्यांना अपेक्षा आहे.
Rohit Sharma fans roaring in Pune. pic.twitter.com/ychRIGNdQV
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2023
कोहली, रोहित शर्मा नेहमीच कर्दनकाळ
बांगलादेशविरोधात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि किंग कोहली (Virat Kohli) नेहमीच टाॅप राहिले आहेत. दोघांची एकत्रित आकडेवारी बांगलादेशला डोकं खाजवण्यासाठी पुरेशी आहे. वयाची छत्तीशी पार करुनही रोहितच्या गगनचुंबी षटकारांनी गोलंदाज भांबावून गेले आहेत.
दोघांच्या विक्रमावर एक नजर टाकूया
रोहित शर्मा आयसीसी टूर्नामेंटमध्ये शेवटच्या 3 सामन्यांमध्ये बांगलादेशविरुद्ध [ODI]
2015 विश्वचषकात शतक
2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक
2019 विश्वचषकात शतक
2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्माची सरासरी 54.69 आणि स्ट्राइक रेट 116.51 आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोनच फलंदाज आहेत ज्यांनी वनडे चेसमध्ये 50+ सरासरी आणि 5,000+ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माची बांगलादेशविरुद्ध वनडेमध्ये सरासरी 56.77 आणि स्ट्राइक रेट 96.09 आहे.
भारत-बांग्लादेश मॅच सुरू झाली, प्रेक्षक मात्र गेटवरच ताटकळत उभे -
तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात क्रिकेट वर्ल्ड कपचा सामना होतोय. पहिलाच सामना हा भारत-बांग्लादेशमध्ये सुरू झालाय. पण प्रेक्षक अद्यापही बाहेरच ताटकळत आहेत. क्रिकेट प्रेमींची गेट नंबर एक वर झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. तिकीट काढून ही सामन्याचा आनंद घेता येत असल्यानं क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचं, यानिमित्ताने दिसून आलं.