Rohit Sharma : पुन्हा फॉर्ममध्ये कसा परतला?; शतक झळकवल्यानंतर रोहित शर्माने सांगितलं रहस्य, सामनावीरचा पुरस्कारही जिंकला!
Rohit Sharma India vs England 2nd ODI : अखेर 'हिटमॅन' रोहित शर्माला सूर गवसला. त्याने पुन्हा एकदा आपल्या लौकिकानुसार तडाखेबंद शतक झळकावले.

India vs England 2nd ODI : अखेर 'हिटमॅन' रोहित शर्माला सूर गवसला. त्याने पुन्हा एकदा आपल्या लौकिकानुसार तडाखेबंद शतक झळकावले आणि भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला 4 गड्यांनी नमविले. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडीही घेतली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी रोहित शर्माच्या फॉर्मचे टेन्शन आता संपले आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने वेगवान शतक झळकावले. पण फ्लॉप शोमध्ये हे कसे घडले याचे रहस्य हिटमनने नंतर उघड केले. त्या सामन्यात त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कारही मिळाला.
रोहितने ठोकले धमाकेदार शतक
कटकमध्ये रोहित शर्माने इंग्लंडला चांगलाच समाचार घेतला. त्याने 90 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकार मारले आणि 119 धावांची जबरदस्त खेळी केली. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, त्याआधी रोहित शर्माच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. नजर कोहलीवरही होती, पण विराट सामन्यात मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
या विजयानंतर रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, संघासाठी धावा काढणे चांगले वाटले. विशेषतः जेव्हा मालिका महत्त्वाच्या टप्प्यावर असते, तेव्हा तुम्ही धावा काढता तेव्हा एक छान वाटतं. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये तुम्हाला तुमचा फलंदाजीचा पॅटर्न बदलावा लागेल, कारण हा फॉरमॅट टी-20 पेक्षा मोठा आणि कसोटीपेक्षा लहान आहे. परिस्थितीनुसार तसेच तुमच्या संघाच्या गरजेनुसार खेळावे लागेल. मला शक्य तितका वेळ क्रीजवर राहायचे होते.
ODI CENTURY number 3⃣2⃣ in 📸📸
— BCCI (@BCCI) February 9, 2025
Describe Captain Rohit Sharma's Cuttack 💯 in one word ✍️
Follow The Match ▶️ https://t.co/NReW1eEQtF#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank | @ImRo45 pic.twitter.com/5mu59OBCTu
रोहित शर्माने इंग्लंडच्या रणनीतीवरही भाष्य केलं. तो म्हणाला की, माझ्याविरुद्धची रणनीती म्हणजे शरीरावर गोलंदाजी करणे. पण मी त्यासाठी तयार होतो. मला शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची चांगली साथ मिळाली. आम्हाला एकमेकांसोबत फलंदाजी करायला आवडते, तो एक उत्तम फलंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तिसरा भारतीय!
यासह, रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे. रोहितचे हे 49 वे आंतरराष्ट्रीय शतक आहे आणि या बाबतीत त्याने राहुल द्रविडला मागे टाकले आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 शतके केली आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर 100 शतकांसह अव्वल स्थानावर आहे, तर विराट कोहली 81 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
