एक्स्प्लोर

Rohit Sharma Ind Vs Eng 2nd ODI: 12 चौकार, 7 षटकार, रोहित शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतलं;5 मिनिटांत पाहा संपूर्ण खेळी, VIDEO

Rohit Sharma Ind Vs Eng 2nd ODI: इंग्लंडचा डाव 49.5 षटकांत 305 धावांवर संपुष्टात आणल्यानंतर भारताने 44.3 षटकांत 6 बाद 308 धावा करत बाजी मारली.

Rohit Sharma Ind Vs Eng 2nd ODI: कटकमध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs England) भारताने इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडीही घेतली. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक धावा केल्या केल्या. रोहित शर्माने 90 चेंडूंत 12 चौकार आणि 7 षटकारांचा पाऊस पाडत 119 धावा ठोकल्या. तर शुभमन गिलने 9 चौकार आणि 1 षटकारसह 60 धावा केल्या. 

इंग्लंडचा डाव 49.5 षटकांत 305 धावांवर संपुष्टात आणल्यानंतर भारताने 44.3 षटकांत 6 बाद 308 धावा करत बाजी मारली. शानदार शतक ठोकणारा कर्णधार रोहित सामनावीर ठरला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतलं. रोहित शर्माने शतक झळकावून अनेक महिन्यांपासून सुरू असलेला दुष्काळ संपवला. तसेच रोहित शर्माच्या कारकिर्दीतील हे दुसरे सर्वात जलद शतक होते. कटक वनडेमध्ये रोहितने फक्त 76 चेंडूत शतक पूर्ण केले. यापूर्वी, रोहितने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूत शतक पूर्ण केले होते.

रोहित शर्माची संपूर्ण खेळी, VIDEO: (Captain Rohit Sharma Century Full Video)

मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली.  तसेच भारताने इंग्लंडविरुद्ध मालिकाही जिंकली. या विजयानंतर रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा म्हणाला की, संघासाठी धावा काढणे चांगले वाटले. विशेषतः जेव्हा मालिका महत्त्वाच्या टप्प्यावर असते, तेव्हा तुम्ही धावा काढता तेव्हा एक छान वाटतं. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये तुम्हाला तुमचा फलंदाजीचा पॅटर्न बदलावा लागेल, कारण हा फॉरमॅट टी-20 पेक्षा मोठा आणि कसोटीपेक्षा लहान आहे, असं रोहित शर्माने सांगितले. रोहित शर्मा पुढे म्हणाला की, तुम्हाला परिस्थितीनुसार तसेच तुमच्या संघाच्या गरजेनुसार खेळावे लागेल. मला शक्य तितका वेळ क्रीजवर राहायचे होते. रोहित शर्माने इंग्लंडच्या रणनीतीवरही भाष्य केलं. भारतीय कर्णधार म्हणाला की माझ्याविरुद्धची रणनीती म्हणजे शरीरावर गोलंदाजी करणे. पण मी त्यासाठी तयार होतो. मला शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची चांगली साथ मिळाली. आम्हाला एकमेकांसोबत फलंदाजी करायला आवडते, तो एक उत्तम फलंदाज आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला. 

संबंधित बातमी:

Rohit Sharma : 19 चेंडूंत 90 धावा, कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
Tomato Price: एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT: शशांकने 4,4,4,4,4,4  टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!
शशांकने 4,4,4,4,4,4 टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!
जयकुमार गोरेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा; सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...
जयकुमार गोरेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा; सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gold Sliver Rate Drop : सामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्या, चांदीच्या दरात घसरणABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 26 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सRajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानातSpecial Report | Kunal Kamra Video | कुणाल कामराचा नवा व्हिडीओ, शिवसेनेला पुन्हा डिवचलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
Tomato Price: एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT: शशांकने 4,4,4,4,4,4  टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!
शशांकने 4,4,4,4,4,4 टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!
जयकुमार गोरेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा; सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...
जयकुमार गोरेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा; सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...
कोल्हापूर हद्दवाढी बैठकांवर बैठका; पुन्हा एकदा नव्याने बैठक होण्याची शक्यता
कोल्हापूर हद्दवाढी बैठकांवर बैठका; पुन्हा एकदा नव्याने बैठक होण्याची शक्यता
Nagpur Violence: नागपूरच्या भालदारपुऱ्यात ओल्यासोबत सुकंही जळालं! दशक्रियेसाठी आलेल्या शेख कुटुंबाने मोजली मोठी किंमत
नागपूरच्या भालदारपुऱ्यात ओल्यासोबत सुकंही जळालं! दशक्रियेसाठी आलेल्या शेख कुटुंबाने मोजली मोठी किंमत
Gadchiroli Crime: शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
Chhaava Box Office Collection Day 40: वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
Embed widget