एक्स्प्लोर

हिटमॅनचा नादच खुळा... अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या 'या' क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनच्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावलं.

Rohit Sharma, IND vs ENG T20 World Cup 2024: ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 (ICC T20 World Cup 2024) च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दणदणीत विजय मिळवून टीम इंडियानं (Team India) फायनल्समध्ये (T20 World Cup 2024 Final) मोठ्या दिमाखात प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियानं इंग्लंडला (England) अक्षरशः लोळवलं. आता फायनल्समध्ये टीम इंडियाची लढत दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा 9 विकेट्सनी पराभव करत फायनल गाठली आहे.  अशातच रात्री उशीरापर्यंत चाललेल्या सामन्यात टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. फायनलचा सामना 29 जून रोजी ब्रिजटाऊन येथे खेळवला जाणार आहे. 

रोहितची अर्धशतकी खेळी, ऐतिहासिक कामगिरी 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनच्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावलं. टी20 विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यात 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा रोहित हा पहिला भारतीय कर्णधार आहे. रोहितनं 39 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावा केल्या. या संपूर्ण इनिंगमध्ये रोहित एखाद्या वादळासारखा खेळला. त्यासोबतच रोहितनं या इनिंगमध्ये टीम इंडियाचा कर्णधार म्हणून आपल्या 5 हजार धावा पूर्ण केल्या. अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा रोहित हा पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे. रोहितपूर्वी केवळ विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांनाच अशी कामगिती करता आली आहे. 

महत्त्वाचं म्हणजे, या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदी असताना विराट कोहलीनं 213 सामन्यांत 12 हजार 883 धावा केल्या आहेत. तर, धोनी 11207 धावांसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर मोहम्मद अझरुद्दीन (8095 धावा) आणि सौरव गांगुली (7643 धावा) यांचा क्रमांक लागतो.

2021 मध्ये रोहित शर्माची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये विराट कोहली कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर ही धुराही रोहितकडे सोपवण्यात आली. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावा (टीम इंडियाचे धुरंधर कर्णधार)

विराट कोहली : 213 सामने, 12883 धावा
एमएस धोनी : 332 सामने, 11207 धावा
एम. अझरुद्दीन : 221 सामने, 8095 धावा
सौरव गांगुली : 195 सामने, 7643 धावा
रोहित शर्मा : 122 सामने, 5032* धावा

कशी होती दोन्ही संघांची प्लेईंग 11? 

टीम इंडियाची प्लेईंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

इंग्लंडची प्लेईंग 11 : फिल सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal speech Chakan: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांसमोर पहिलं भाषण, भुजबळ भरभरुन बोललेAashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलंChhagan Bhujbal Sharad Pawar : छगन भुजबळ-शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवासSuresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Eknath Shinde : मोठी बातमी, गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार,मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार : एकनाथ शिंदे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा 15000 रुपयांची एसआयपी केल्यास 1 कोटी किती वर्षात जमा होणार? जाणून घ्या
एसआयपीद्वारे 15000 रुपयांची म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास 1 कोटींची रक्कम किती वर्षात मिळेल, जाणून घ्या
Embed widget