दिनेश लाड यांना 'द्रोणाचार्य पुरस्कार' द्या; रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूरचा प्रस्ताव
क्रिकेट प्रशिक्षक असलेल्या दिनेश लाड यांनी रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांच्यासारख्या खेळाडूंना घडवलं. त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार (Dronacharya Award) देण्यात यावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला चांगले खेळाडू देण्यामध्ये मुंबईतील प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांचं मोठं योगदान आहे. दिनेश लाड यांचं योगदान लक्षात घेता त्यांना 'द्रोणाचार्य पुरस्कार' (Dronacharya Award) देण्यात यावा असा प्रस्ताव क्रिकटपटू रोहित शर्मा आणि शार्दूल पटेल यांनी दिला असल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे. भारतीय खेळांमध्ये सर्वोच्च योगदान देणाऱ्या प्रशिक्षणाला द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. द्रोणाचार्य पुरस्कार हा महाभारतातील गुरु द्रोण यांच्या नावाने दिला जातो.
दिनेश लाड यांचे क्रिकेटप्रति असलेले प्रेम आणि योगदानामुळे त्यांचं क्रिकेट क्षेत्रात मोठं नाव आहे. जर त्यांनी एखाद्या खेळाडूतील कौशल्य ओळखलं तर ते त्याच्या मागे आपलं सर्वस्व पणाला लावतात. अशा वेळी ते त्यांना मिळणारे पैसे वा मानधनाचा विचार करत नसल्याचं अनेकजण सांगतात. दिनेश लाड यांनी गोराई येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूरचे खेळातील कौशल्य ओळखलं आणि त्यांना घडवलं. रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर सध्या भारतीय संघासाठी खेळत आहेत. रोहित शर्मा तर जगभरातील गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जातो. दिनेश लाड यांचे प्रशिक्षण घेतलेल्या अनेक खेळाडूंनी चांगलं नाव कमावलं आहे.
शार्दूल ठाकूरला या वेळी टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान मिळालं आहे. दुखापतग्रस्त अष्टपैलू हार्दिक पांड्याला कव्हर म्हणून शार्दूल ठाकूरला भारतीय संघात स्थान देण्यात आल्याचं समजतं. निवड समितीनं भारतीय संघव्यवस्थापनाशी चर्चा करून डावखुरा स्पिनर अक्षर पटेलला भारताच्या विश्वचषक संघातून वगळलं असून, त्याला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं आहे. अष्टपैलू शार्दूल ठाकूरचा आधी भारताच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश होता. त्याला अक्षर पटेलऐवजी भारताच्या मुख्य संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळं आता श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि अक्षर पटेल हे तिघं राखीव खेळाडू असतील.
ICC टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन , शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
