दक्षिण आफ्रिका मालिकेत रोहित-विराटसह पाच जणांना आराम, दोन जण दुखापतग्रस्त
South Africa Tour of India : आयपीएलचा 15 वा हंगाम संपल्यानंतर आठवडाभरानंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरोधात पाच सामन्याची टी 20 मालिका खेळणार आहे.

South Africa Tour of India : आयपीएलचा 15 वा हंगाम संपल्यानंतर आठवडाभरानंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरोधात पाच सामन्याची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताच्या दिग्गज खेळाडूंना आराम मिळण्याची शक्यता आहे. वर्कलोड मॅनेज करण्याच्या दृष्टीकोणातून बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे समजतेय. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, विकेटकिपर ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आराम मिळणार आहे. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याआधी सिनिअर खेळाडूंना आराम मिळावा, यासाठी बीसीसीआयने निर्णय घेतलाय. दीपक चाहर, सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकाविरोधात खेळताना दिसणार नाहीत. दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी 22 मे रोजी भारतीय संघाची निवड होणार आहे. मुंबईमध्ये बीसीसीआय निवड समिती याबाबतचा निर्णय घेणार आहे. यामध्ये अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळू शकते.
दक्षिण आफ्रिकाविरोधातील मालिकेतून भारतीय संघात पुन्हा अष्टपैलू हार्दिक पांड्या पुनरागमन करण्यास सज्ज झालाय. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे हार्दिक पांड्याने यशस्वी नेतृत्व केले. हार्दिकच्या नेतृत्व गुणांनी सर्वांनाच प्रभावित केलेय. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरोधातील टी 20 मालिकेत रोहितच्या अनुपस्थितीत संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्याची शक्यताही पीटीआयने वर्तवली आहे. त्याशिवाय पंजाबचा सलामी फलंदाज शिखर धवनही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे.
बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व सिनिअर खेळाडू थेट इंग्लंडमध्ये पाचवा कसोटी सामना खेळण्यासाठी जातील. आयपीएलनंतर या खेळाडूंना तीन ते चार आठवड्याचा ब्रेक गरजेचा आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकाविरोधात त्यांना आराम देण्यात येणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारताचे सर्व महत्वाचे खेळाडू ताजेतवाने असायला हवेत, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी भारताच्या सर्व सिनिअर खेळाडूंना पुढील सात आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यातून आराम देण्या येणार आहे.
मोहसीन खान - उमरान मलिकला संधी -
हैदराबादचा वेगवान मारा उमरान मलिक आणि लखनौचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान यांना भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. या दोन्ही खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
कसा असेल भारतीय संघ -
ऋतुराज गायकवाड, इशान किशान, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन आणि शिखर धवन भारतीय संघाची फलंदाजीची बाजू सांभाळतील. भूवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, हर्षल पटेल, आवेश खान, रविचंद्र अश्विन, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
IPL संपताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत टी-20 मालिका खेळणार
भारतामध्ये सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम 29 मे रोजी संपणार आहे. त्यानंर दहा दिवसांत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी 20 मालिका रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवणून या मालिकेचं आयोजन केले आहे. 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पाच टी 20 सामने होणार आहेत. अखेरचा टी 20 सामना 19 जून रोजी होणार आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक
| भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेचं वेळापत्रक | ||||
| क्रमांक
| दिवस | तारीख | सामना | ठिकाण |
| 1 | गुरुवार | 9 जून | 1st T20I | दिल्ली |
| 2 | रविवार | 12 जून | 2nd T20I | कटक |
| 3 | मंगळवार | 14 जून | 3rd T20I | वायजाग |
| 4 | शुक्रवार | 17 जून | 4th T20I | राजकोट |
| 5 | रविवार | 19 जून | 5th T20I | बेंगलरु |




















