![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rohan Bopanna : टेनिसपटू रोहन बोपन्नाने रचला इतिहास, इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेच्या जेतेपदावर कोरलं नाव
Rohan and Ebden : रोहनने ऑस्ट्रेलियाचा त्याचा साथीदार मॅथ्यू एब्डेन याच्या साथीने इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धा जिंकली असून विशेष म्हणजे ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
![Rohan Bopanna : टेनिसपटू रोहन बोपन्नाने रचला इतिहास, इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेच्या जेतेपदावर कोरलं नाव Rohan Bopanna becomes oldest player to win ATP Masters 1000 title with his partner Ebden Rohan Bopanna : टेनिसपटू रोहन बोपन्नाने रचला इतिहास, इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेच्या जेतेपदावर कोरलं नाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/20/419aa1074a8824f58674b554db385e2d1679305442551323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rohan Bopanna at ATP Masters 1000 title : भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) याने रविवारी एका खास रेकॉर्डला गवसणी घातली आहे. त्याने त्याचा ऑस्ट्रेलियाचा त्याचा साथीदार मॅथ्यू एब्डेन याच्या साथीने इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स 1000 (ATP Masters 1000) या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे वयाच्या 43 व्या त्याने ही कामगिरी केली असून इतक्या जास्त वयात ही कमाल करणारा तो पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.
View this post on Instagram
भारतासाठी अनेक महत्त्वाची जेतेपदं पटकावणारा रोहन बोपन्ना याने आता त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 43 वर्षीय रोहनने त्याचा ऑस्ट्रेलियाचा त्याचा साथीदार मॅथ्यू एब्डेन ज्याचं वय 35 वर्ष आहे त्याच्यासोबत इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे. या जोडीने ग्रेट ब्रिटनचा नील स्कूपस्की आणि नेदरलँडचा वेस्ली कूलहोफ यांच्यावर ६-३, २-६, १०-८ च्या फरकाने विजय मिळवत जेतेपदाची ट्रॉफी खिशात घातली आहे. फायनलआधी या जोडीने पहिल्या फेरीत राफेल मातोस - डेव्हिड हर्नांडीझ या जोडीला पराभूत केले. त्यानंतर फेलिक्स एलियासिम - डेनिस शॅपोवालोव या जोडीला पराभूत करत त्यांनी उपांत्य फेरीत एन्ट्री मारली होती.
'या जेतेपदाचा आनंद मोठा आहे'
रोहनने कॅनडाच्या डॅनियल नेस्टर याला मागे टाकलं असून नेस्टरने 2015 साली सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धा वयाच्या 42 व्या वर्षी जिंकली होती. रोहन बोपन्नाने नेस्टरचा हा विक्रम मागे टाकला आहे. दरम्यान विजयानंतर बोलताना बोपन्ना म्हणाला, 'ही स्पर्धा जिंकल्यानंतर नेस्टरसोबत बोललो. त्याचा विक्रम मोडल्याचंही त्याला सांगितलं. या जेतेपदाचा आनंद मोठा आहे.'' रोहनने आतापर्यंत टूर स्तरावर एकूण 24 विजेतेपदे जिंकली आहेत. बोपन्ना आणि मॅट एबडेन या जोडीने उपांत्य फेरीत गतविजेते आणि दोन वेळचे विजेते जॉन इस्नर आणि जॅक सॉक यांचा पराभव केला. याआधी उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अलिसिमे आणि डेनिस शापोवालोव्ह यांचा पराभव केला. भारत-ऑस्ट्रेलियन जोडीने त्यांच्या पहिल्या सामन्यात राफेल माटोस आणि डेव्हिड वेगा हर्नांडेझ यांचा पराभव केला होता. माजी जागतिक क्रमवारीत तिसरा खेळाडू असलेला बोपण्णा या विजयासह एटीपी दुहेरी क्रमवारीत चार स्थानांनी 11व्या स्थानावर पोहोचला आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)