(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abhishek Singhvi On Rishabh Pant: 'ऋषभ पंतला एका चांगल्या वकीलाची गरज' काँग्रेस नेता अभिषेक मनु सिंघवी यांचं ट्वीट
Abhishek Singhvi On Rishabh Pant: आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उद्यापासून मिशन टी-20 वर्ल्डकपला सुरुवात करेल.
Abhishek Singhvi On Rishabh Pant: आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उद्यापासून मिशन टी-20 वर्ल्डकपला सुरुवात करेल. भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये यांच्यात 10 ऑक्टोबरला वार्मअप सामना खेळला जाणार आहे, जिथून भारतीय संघ आपली रणनीती आखायला सुरुवात करेल. दरम्यान, भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा चर्चेत आलाय. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाही (Urvashi Rautela) ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. ज्यामुळं नेटकरी ऋषभ पंतसोबतशी संबंधित मीम्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Singhvi) यांनीही या मुद्द्यावर एक मजेदार ट्विट केलंय. ऋषभला एका चांगल्या वकिलाची गरज आहे, असं ट्वीट अभिषेक मनु सिंघवी यांनी केलंय.
आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ 7 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला दाखल झाला आहे. एवढेच नव्हेतर, वेळ न घालवता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं पर्थमध्ये सरावाला सुरुवात केली. याचदरम्यान उर्वशी रौतेलाची एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उर्वशी देखील ऑस्ट्रेलियाला पोहचली आहे. माझ्या मनानं मला ऑस्ट्रेलियात जाण्यास सांगितलं, असंही तिनं कॅप्शनमध्ये लिहलंय. त्यानंतर चाहत्यांनी पुन्हा एकदा ऋषभ पंतची मजा घ्यायला सुरुवात केली आहे.
अभिषेक सिंघवी यांचं ट्वीट-
Rishabh Pant deserves a good advocate & a restraining order in his favour.
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) October 9, 2022
ऋषभला वाढदिवासाची शुभेच्छा देऊन झाली ट्रोल
यापूर्वीही उर्वशी रौतेलानं ऋषभ पंतशी जुडीत सोशल मीडियावर अनेक पोस्ट केले आहेत. ती आशिया चषक पाहण्यासाठी यूएईलाही गेली होती. याशिवाय उर्वशीनं नुकतेच ऋषभ पंतचं नाव न घेता त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ज्यानंतर नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केलं.
उर्वशी रौतेलाची इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
हे देखील वाचा-