एक्स्प्लोर

BCCI चा भारतीय क्रिकेटपटूंना दिलासा, इंग्लंड दौऱ्यात कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी

इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंना मोठा दिलासा दिला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी खेळाडूंना मिळाली आहे.

मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना या महिन्यात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघात हा सामना होणार आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने खेळाडूंना मोठा दिलासा दिला आहे. भारतीय संघाच्या खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि सहाय्यक स्टाफला इंग्लंड दौऱ्यासाठी कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी मिळाली आहे.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा आहे. भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरोधात जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिकाही होणार आहे.

संपूर्ण दौऱ्यात खेळाडूंचं कुटुंब त्यांच्यासोबत इंग्लंडमध्ये राहू शकतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "भारतीय खेळाडूंना कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळाली आहे. जोपर्यंत त्यांना राहायचं आहे तोपर्यंत ते खेळाडूंसोबत राहू शकतात. जर त्यांना दौऱ्याच्या संपूर्ण कालावधीपर्यंत राहायचं असेल तरी ते राहू शकतात."

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही क्रिकेटपटूंना मंजुरी 
भारतीय पुरुषांचा क्रिकेट संघ, महिला क्रिकेट संघासह चार्टर प्लेनने इंग्लंडला रवाना होणार आहे. महिला खेळाडूंना हे नियम लागू नाहीत. महिला क्रिकेट संघाचा दौरा मर्यादित काळासाठी असल्याने त्यांना कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता कमीच आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही खेळाडूना कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी मिळाली होती.

पुरुषांचा संघ तिथे 100 दिवसांपेक्षा जास्त काळ राहणार आहे. तर महिला क्रिकेट संघाचा दौरा महिनाभराचा आहे, ज्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेण्टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ 3 जून रोजी लंडनला पोहोचणार असून तिथून साऊथम्पटनला रवाना होईल आणि तिथे त्यांना क्वॉरन्टीन राहावं लागेल. 

पुढील काही महिने भारतीय क्रिकेटपटूंसाठी अतिशय व्यस्त आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर तातडीने यूएईमध्ये आयपीएलच्या चौदाव्या मोसमातील उर्वरित सामने खेळवण्यात येणार आहेत. तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्डकपही खेळवला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
Ind vs Afg Test Day-1 Live Update : शतक झळकावून केएल राहुल OUT, कर्णधार गिलचे अर्धशतक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Ind vs Afg Test Day-1 Live : शतक झळकावून केएल राहुल OUT, कर्णधार गिलचे अर्धशतक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
India A Squad VS Sri Lanka : ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
Suryakumar Yadav News : भारताचा विजेता कर्णधार कायमचा OUT! सूर्यावर BCCIची मोठी कारवाई, कर्णधारपद गेले, संघातूनही बाहेर, अजित आगरकर काय म्हणाले?
भारताचा विजेता कर्णधार कायमचा OUT! सूर्यावर BCCIची मोठी कारवाई, कर्णधारपद गेले, संघातूनही बाहेर, अजित आगरकर काय म्हणाले?

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: 'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
LIC : एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, 3 जूनला 51750 शेअरची खरेदी
एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, किती कोटी मोजले?
India A Squad VS Sri Lanka : ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Balasaheb Thorat on Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
Prasad Vedpathak White Line Controversy: सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
Embed widget