सॉरी सरफराज! रवींद्र जाडेजानं 'त्या' चुकीची जाहीर माफी मागितली!
Sarfaraz Khan : राजकोट येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताने वर्चस्व मिळवलं. रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांची जिगरबाज शतकं आणि पदार्पण करणाऱ्या सरफराज खानचं अर्धशतक, हे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं.
Ravindra Jadeja Apologising to Sarfaraz Khan : राजकोट येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताने वर्चस्व मिळवलं. रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांची जिगरबाज शतकं आणि पदार्पण करणाऱ्या सरफराज खानचं अर्धशतक, हे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. इंग्लंडविरोधात सरफराज खान यानं अर्धशतक ठोकलं. पण दुर्वैवीरित्या तो धावबाद झाला. रवींद्र जाडेजाच्या शतकाच्या नादात सरफराज खान धावबाद झाला. रवींद्र जाडेजा यानं सरफराज खान याला धावण्यासाठी कॉल दिला, पण नंतर मागे घेतला. तोपर्यंत त्यानं क्रीज सोडलं होतं. त्यामुळे तो धावबाद झाला. त्यावरुन रवींद्र जाडेजा याच्यावर अनेकांनी टीका केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रवींद्र जाडेजा यानं सरफराज खान याची जाहीर माफी मागितली आहे.
नेमकं झालं काय ? -
इंग्लंडविरोधात रवींद्र जाडेजा यानं जिगरबाद शतक ठोकलं. पण तो 99 धावांवर खेळत होता. त्यावेळी सरफराज खान धावबाद झाला. त्याला रवींद्र जाडेजा जबाबदार असल्याचं सर्वांचं म्हणणं आहे. रवींद्र जाडेजा यानं चेंडू फटकावल्यानंतर एक धाव घेण्यासाठी सरफराजला कॉल दिला. पण चेंडू जेम्स अँडरसनच्या हातात असल्याचं दिसल्यानंतर माघार घेतली. पण तोपर्यंत सरफराज खूप पुढे आला होता, तो मागे जाईपर्यंत अँडरसन यानं दांड्या उडवल्या. सरफराज खान धावबाद झाला. रवींद्र जाडेजा यानं नंतर शतक पूर्ण केले. पण सोशल मीडियावर रवींद्र जाडेजा यानं धावबाद केल्याची जोरदार चर्चा रंगली.
रवींद्र जाडेजानं मागितली जाहीर माफी -
सरफराज खान पदार्पणातच शानदार फलंदाजी करत होता. त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. पण दुर्वैवीरित्या तो धावबाद झाला. रवींद्र जाडेजाच्या कॉलमुळे तो धावबाद झाला होता. त्यामुळे रवींद्र जाडेजा यानं मोठ्या मनानं त्याची माफी मागितली. जाडेजानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केली असून त्यामध्ये माफी मागितली. त्याशिवाय सरफराज चांगला खेळल्याचेही तो म्हणाला. रवींद्र जाडेजाने इंस्टाग्राम स्टेरिला लिहिले की, “वाईट वाटत आहे. सरफराज मी चुकीचा कॉल दिला होता. पण तू चांगला खेळला.” जडेजाच्या इंस्टा स्टोरिचे स्क्रीनशॉट्स सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.
Ravindra Jadeja apologising to Sarfaraz Khan. pic.twitter.com/9QlW5CuWin
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 15, 2024
पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व -
राजकोट कसोटीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. 33 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. पण रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांनी भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवसाखेर भारताची धावसंख्या 5 विकेट्सच्या मोबदल्यात 326 धावा इतकी आहे. रोहित शर्मा (131) आणि रवींद्र जडेजा (110*) यांनी भारतासाठी पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे. तर सरफराज खान (Sarfaraz Khan) याने 66 चेंडू खेलून 62 धावा केल्या.