प्लेईंग 11 मध्ये विराट कोहलीची जागा कोण घेणार, इंग्लंडविरोधात हे 11 शिलेदार उतरणार मैदानात?
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून कसोटी मालिकेला (IND vs ENG test) सुरुवात होणार आहे. हैदाराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) दोन्ही संघ आमनेसामने असतील.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून कसोटी मालिकेला (IND vs ENG test) सुरुवात होणार आहे. हैदाराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) दोन्ही संघ आमनेसामने असतील. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पहिल्या दोन कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाची प्लेईंग 11 कशी असेल? विराट कोहलीच्या जागी कुणाला संधी मिळणार ? याची चर्चा सुरु झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ हैदराबादमध्ये सराव करत आहे. भारतीय संघाच्या प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळेल? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल सलामीची भूमिका पार पाडतील. गेल्या काही दिवसांपासून दोघांनी दमदार सलामी दिली आहे. अनुभवी रोहित शर्मासोबत युवा यशस्वी जायस्वाल साहेबांची गोलंदाजी फोडून काढतील. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल फलंदाजीला येईल. शुभमन गिल याला तिसऱ्या क्रमांकावर हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला सिद्ध कऱण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर केएल राहुल फलंदाजीला उतरेल. तर श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल.
लोअर मिडल ऑर्डरमध्ये रवींद्र जाडेजा, केएस भरत अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांच्यावर जबाबदारी असेल. केएस भरत विकेटकीपर म्हणून खेळण्याची शक्यता आहे. रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि आर. अश्विन अष्टपैलू म्हणून खेळतील. भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. वेगवान माऱ्याची धुरा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या खांद्यावर असेल.
पहिल्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, केएस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), मोहम्मद सिराज
इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान.
पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ -
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)