(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IRE vs IND 2nd T20I, Weather Report : दुसऱ्या सामन्यावरही पावसाचं सावट, जाणून घ्या कसं असेल डबलिनचं वातावरण
IND vs IRE : भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर असून यावेळी पावसानेही हजेरी लावल्यामुळे पहिल्या सामन्यात व्यत्यय आलाच आता दुसऱ्या सामन्यावेळीही हा व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
India vs Ireland : भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यात सध्या दोन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात असून पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशीरा सुरु झाला तसंच दोन्ही संघाना 12-12 षटकंच खेळायला मिळाली. अशात आता दुसऱ्या टी20 सामन्यावरही पावसाचं सावट असल्याचं दिसून येत आहे. कारण हा सामना उद्या अर्थात मंगळवारी (28 जून) होणार असून यावेळी सामना होणाऱ्या आयर्लंडमधील दी विलेज, डबलिन क्रिकेट मैदानात (The Village Stadium, Dublin) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय वेळेनुसार हे सामने रात्री 9 वाजता सुरु होणार आहेत. पण पहिल्या सामन्यात नाणेफेकीनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे सामना थेट 11 वाजून 20 मिनिटांनी सुरु झाला. तसंच दोन्ही संघाच्या प्रत्येकी 8 ओव्हरही कमी करण्यात आल्या. त्यात आता दुसऱ्या सामन्यावेळीही मैदानाती हवामान पावसाचं असल्याची माहिती समोर येत आहे. हवामानाची माहिती देणारी वेबसाईट accuweather च्या रिपोर्टनुसार डबलिन (The Village Stadium, Dublin) मध्ये आज (मंगळवारी) मुसळधार पाऊस होऊ शकतो. ज्यामुळे खेळपट्टी भिजून उद्या सामन्यावेळी खेळाडूंना अडचण येऊ शकते. तसंच सामन्यादरम्यानही हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात असंही या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं आहे.
पहिल्या सामन्यात भारताचा सात विकेट्सने विजय
भारत विरुद्ध आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतरही अखेर सामना पार पडला. दोन्ही संघाना 12-12 षटकं खेळायला देण्यात आली. ज्यात आयर्लंडने108 धावा करत भारतासमोर 109 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे भारताने दीपक हुडाच्या नाबाद 47 धावांच्या जोरावर तीन गडी गमावत भारताने 9.2 षटकात पूर्ण केलं आहे.
हे देखील वाचा-