एक्स्प्लोर

Punjab Kings Playoff Scenario : आयपीएलमधील सर्वांत मोठा ट्विस्ट! 6 विजयांनी मैदान गाजवलं... पण आता पंजाब किंग्सवर OUT होण्याची नामुष्की, श्रेयस अय्यरच्या टीमला काय झालं?

Punjab Kings Playoff Scenario In Marathi News : पंजाब किंग्सने आयपीएल 2026 ची सुरुवात ज्या दमदार अंदाजात केली होती, ते पाहता ही टीम प्लेऑफच्या शर्यतीत अडचणीत येईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.

Punjab Kings Playoff Scenario In Marathi News : पंजाब किंग्सने आयपीएल 2026 ची सुरुवात ज्या दमदार अंदाजात केली होती, ते पाहता ही टीम प्लेऑफच्या शर्यतीत अडचणीत येईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सोमवारी धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पंजाबला 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. हा पीबीकेएसचा सलग चौथा पराभव ठरला असून आता श्रेयस अय्यरच्या संघावर प्लेऑफमधून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पंजाब किंग्सचा सलग चौथा धक्का  (Punjab Kings Playoff Scenario)

आयपीएल 2026 मधील 55वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने थरारक विजय मिळवत पंजाबचा पराभव केला. विशेष म्हणजे, हा पंजाबचा सलग चौथा पराभव ठरला. हंगामाच्या सुरुवातीला पंजाबने सलग 7 सामने गमावले नव्हते. मात्र पहिल्या पराभवानंतर संघाची घसरगुंडी सुरू झाली. राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि आता दिल्ली कॅपिटल्सकडून पंजाबला हार पत्करावी लागली आहे.

गुणतालिकेत अजूनही चौथ्या स्थानावर (IPL 2026 Points Table
)

सलग चार पराभवांनंतरही पंजाब किंग्स सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. पंजाबने आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यापैकी 6 विजय, 4 पराभव आणि 1 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे संघाच्या खात्यात 13 गुण आहेत. पंजाबचा नेट रनरेट +0.428 इतका आहे.

आता प्लेऑफमध्ये कसं पोहोचणार?

पंजाबसाठी आता प्रत्येक सामना करो किंवा मरो असा असणार आहे. संघाला अजून 3 सामने खेळायचे आहेत आणि त्यापैकी किमान 2 सामने जिंकणे अत्यावश्यक आहे. सध्या गुणतालिकेतील अव्वल 3 संघांकडे 14 गुण आहेत. त्यामुळे यंदा प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान 16 गुणांची गरज भासू शकते.

अशा परिस्थितीत पंजाबने उर्वरित 3 पैकी 2 सामने जिंकले, तर त्यांच्या खात्यात 17 गुण होतील आणि प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित होईल. मात्र आणखी एक पराभव झाला, तर पीबीकेएसची अडचण मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

हे ही वाचा -

Tim David News : मुंबईच्या खेळाडूंना अश्लील हातवारे करणाऱ्या टिम डेव्हिडसाठी धोक्याची घंटा; आता थेट 'बॅन'ची टांगती तलवार, नेमकं काय घडलं? 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pat Cummins : बेस्ट टीम मैदानात उतरवल्यानंतरही घरच्या मैदानावर बांगलादेशकडून पराभव, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
बांगलादेशनं 23 वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवलं, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget