Priyank Panchal News : 'क्रिकेटच्या पलिकडेही जग असतं...’; 14,050 धावा अन् 35 शतके, तरी टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने का घेतली निवृत्ती?
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक असे खेळाडू असे आहेत, ज्यांनी घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली.

Why did Priyank Panchal Retire : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक असे खेळाडू असे आहेत, ज्यांनी घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. पण राष्ट्रीय संघात संधी मिळाली नाही. अशा खेळाडूंपैकी एक म्हणजे गुजरातचा प्रियांक पांचाल. अनेक वर्षांच्या वाटेवर त्याला अखेर 26 मे 2025 रोजी क्रिकेटला कायमचा निरोप द्यावा लागला.
क्रिकेटपेक्षा मोठं आहे आयुष्य
प्रियांक पांचालने नुकताच 35 वर्षांच्या वयात क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे कारण समजावून सांगितले. तो एक्स (पूर्वी ट्विटर) वर फॉलोअर्ससोबत ‘आस्क मी एनीथिंग’ या सत्रात बोलत होता, तेव्हा एका चाहत्याने त्याला विचारले की इतक्या लवकर निवृत्ती का घेतली? त्यावर प्रियांकने सांगितले की, प्रत्येक क्रिकेटरचे दोन करिअर असतात, खेळायचे आणि न खेळायचे. जेव्हा त्याला कळाले की तो भारतासाठी खेळू शकणार नाही, तेव्हा त्याने दुसरे करिअर लवकर सुरू करण्याचा आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी, आयुष्यात क्रिकेटपेक्षाही मोठी गोष्ट आहे.
Every cricketer has two careers - the playing & non-playing one. Once I knew I couldn’t play for India, it made sense to begin the latter early and get a headstart. Eventually there’s more to life than cricket #AMAwithPriyank https://t.co/sqMefo8Id1
— Priyank Panchal (@PKpanchal09) August 9, 2025
पंचालने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये भारत अ संघाचे नेतृत्व केले होते, काही वेळा वरिष्ठ टीममध्ये पर्याय खेळाडू म्हणून देखील गेला होता. इंग्लंडविरुद्ध भारतातील टेस्ट मालिकेत अभिमन्यु ईश्वरनसोबत त्याला रिझर्व सलामी फलंदाज म्हणून नावदेखील घेतले गेले. तो अनेकदा भारतीय रेड-बॉल टीमचा भाग होता, जिथे तो जखमी रोहित शर्माच्या जागी संघात होता.
14,050 धावा अन् 36 शतके
प्रियांकने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये फर्स्ट क्लास, लिस्ट अ आणि टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 14,050 धावा केल्या. त्याने 36 शतकं ठोकली आहेत. 127 फर्स्ट क्लास सामने खेळताना त्याने 8,856 धावा आणि 29 शतकं केली. 97 लिस्ट अ सामनेत 3,672 धावा व 8 शतकं तर 59 टी-20 सामन्यांत 1,522 धावा आणि 9 अर्धशतकं ठोकली. फर्स्ट क्लासमध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोर नाबाद 314, लिस्ट अ मध्ये 136 आणि टी-20 मध्ये 79 होता.
हे ही वाचा -





















