(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS : चौथ्या कसोटीसाठी मोदींसह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजही उपस्थित, कर्णधारांचा केला खास सन्मान, पाहा VIDEO
India vs Australia Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील चौथा कसोटी सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु होत असून भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी या सामन्याला उपस्थिती दाखवली आहे.
India vs Australia Test: भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात सुरु बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) चौथा कसोटी (IND vs AUS 4th Test) आणि अखेरचा सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad Narendra Modi Stadium) खेळवला जात आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना असून भारताने 2 तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकल्यामुळे आता ही मालिका भारत सामना जिंकून जिंकणार की ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बरोबरीत सुटणार हे पाहावं लागेल. त्यामुळे हा सामना निर्णायक असून या विशेष सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज (Anthony Albanese) हे देखील पहिल्या दिवशीच्या खेळाडसाठी मैदानात उपस्थित राहिले.
पीएम मोदी आणि अँथनी अल्बानीज हे दोघेही नाणेफेकीदरम्यान म्हणजेच खेळ सुरु होण्यापूर्वी मैदानात पोहोचले असून दोघांसाठी खास स्टेज तयार करण्यात आला होता. यावेळी दोन्ही पंतप्रधानांनी आपआपल्या देशाच्या कर्णधारांचा खास कसोटी कॅप देऊन सन्मान केला. दोन पंतप्रधानांनी गोल्फ कारने मैदानाची फेरी मारली. या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये उपस्थित हजारो प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून या सर्व कार्यक्रमाबद्दल दाद दिली. मोदी आणि अल्बानीज या दोघांनी आपापल्या संघाचे कर्णधार रोहित शर्मा आणि स्टीव्ह यांना कसोटी कॅप्स देतानाही प्रेक्षक फार आनंदी दिसत होते. हा सामना पाहण्यासाठी जवळपास 1.32 लाख प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले होते. मोदी आणि अल्बानीज यांनी सामन्यापूर्वी खेळाडूंची भेटही घेतली.
पाहा VIDEO -
View this post on Instagram
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी साजरी केली होळी
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी बुधवारी साबरमती आश्रमात महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या भारत भेटीच्या पहिल्या दिवशी राजभवनात होळी खेळली. सायंकाळी ते शहरातील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पोहोचले आणि थेट महात्मा गांधींचं पूर्वीचं निवासस्थान असलेल्या साबरमती आश्रमात गेले. चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले अँथनी अल्बानीज यांनी राजभवनाला रवाना होण्यापूर्वी पुस्तकात लिहिलं आहे की, महात्मा गांधींच्या आश्रमाला भेट देणं, त्यांना आदरांजली वाहणं, ज्यांचं तत्वज्ञान आणि जीवनमूल्य आहेत. तरीही जगाला प्रेरणा द्या. त्याच्या उदाहरणातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. राज्याची राजधानी गांधीनगर येथील राजभवनात संध्याकाळी उशिरा अल्बानीज यांनी होळी खेळली. राजभवनात होळी साजरी करताना राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री पटेल यांनी त्यांना रंग लावला.
हे देखील वाचा-