एक्स्प्लोर

India vs Australia, Playing 11 : चौथ्या कसोटीत महत्त्वाच्या बदलासह भारत मैदानात, सिराजला विश्रांती तर शमीला संधी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग-11

India vs Australia 4th Test: टीम इंडिया आणि टीम ऑस्ट्रेलिया संघांमधील चौथा कसोटी सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु होणार असून मालिकाविजयासाठी हा सामना भारताला जिंकणं अनिवार्य आहे.

India vs Australia Test: भारतीय संघ (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Team Australia) यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील (IND vs AUS 4th Test) शेवटचा आणि निर्णायक सामना आजपासून (9 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad Narendra Modi Stadium) खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान संघाच्या प्लेईंग 11 चा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात उतरवलेलाच संघ उतरवला असून भारत एका महत्त्वाच्या बदलासह मैदानात उतरला आहे.

भारताने आपला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला पुन्हा एकदा अंतिम 11 मध्ये संधी दिली असून मोहम्मद सिराज याला विश्रांती दिली आहे. याशिवाय गोलंदाजीसाठी उमेश यादवही संघात आहे. तर सलामीला आजही केएलच्या जागी शुभमन गिल कर्णधार रोहित शर्मासोबत उतरणार आहे. तसंच चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत हे फलंदाजीला असून रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल अष्टपैलू कामगिरी निभावतील. तर नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग 11 पाहूया...

टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन : स्टीव स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन, नॅथन लियॉन

View this post on Instagram
 
A post shared by Team India (@indiancricketteam)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया head to head

आजवरच्या इतिहासाचा विचार केल्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 105 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 44 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. दरम्यान आजची कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. सध्या, टीम इंडिया 60.29 च्या विजयाच्या टक्केवारीसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया 68.52 विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर असून WTC फायनलमध्ये पोहोचली आहे.

इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget